इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजाना जबरदस्त त्रास देत दुहेरी शतक झळकावले. इंग्लंडने त्याच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार जो रूटने या डावात सर्वाधिक २१८ धावांची खेळी केली. त्यात १९ चौकार आणि ६ षटकार यांचा समावेश होता. रूट गेल्या काही काळापासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करत आहे. रूटच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अष्टपैलू बेन स्टोक्सनेही जो रूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या मते “रूट ज्याप्रमाणे फिरकीपटूंचा सामना करतो, त्याप्रमाणे इंग्लंडच्या अर्ध्या संघालाही ते जमणार देखील नाही. फिरकीपटूंचा सामना तो अत्यंत सुलभरीत्या करत असून त्याची खेळी पाहण्यास देखील तितकीच मजा येते. त्यामुळे मला नाही वाटत की इंग्लंडचे अर्धे फलंदाज त्याच्याप्रमाणे खेळू शकतात.”
रूटने दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर षटकार ठोकत पाचव्यांदा कसोटीत दुहेरी शतक ठोकले. ‘तो ज्या प्रकारे खेळतो, ते पाहून फलंदाजी करणे सोपे दिसते आणि ज्याप्रमाणे त्याने पुढे जाऊन एका षटकारासह दुहेरी शतक पूर्ण केले त्याबद्दल मला आश्चर्य वाटले,’ असेही स्टोक्स म्हणाला.
दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत ५०० पेक्षा अधिक धावा केल्याने इंग्लंड संघ मजबूत स्थितीत असल्याचेही स्टोक्सने म्हटले. या सामन्यात स्टोक्स आणि रुटमध्ये १२४ धावांची भागीदारी झाली. स्टोक्सने ८२ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा अश्विन दुसरा, पाहा पहिलं नाव कुणाचं
T10 League: फलंदाजाने गोल फिरत मारला जबरा चौकार; नंतर गोलंदाजाला केला ‘असा’ इशारा, पाहा व्हिडिओ
‘या’ खास कारणासाठी भारताला पराभूत करायचे आहे, बेन स्टोक्सने उघडले गुपित