जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक शॉन पॉलक हे आज (१६ जुलै) आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. शॉन पॉलक हे दक्षिण आफ्रिका संघाचे दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या बॅटने तुफान फटकेबाजी केली आहे. तसेच संधी मिळताच गोलंदाजीने देखील दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे वडील पीटर पॉलक, आजोबा अँड्रू पॉलक आणि काका ग्रीम पॉलक हे दक्षिण आफ्रिका संघासाठी खेळले आहेत.
तसेच शॉन पॉलक हे आपल्या कुटुंबात इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धा खेळणारे पहिलेच क्रिकेटपटू होते. त्यांनी काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत डरहॅम आणि वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वार्विकशायर संघाकडून खेळताना त्यांनी पहिल्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. लिस्टरशायर संघाविरुद्ध खेळताना त्यांनी ४ गडी बाद केले होते. ते लिस्ट-ए सामन्यात अशी कामगिरी करणारे पहिलेच गोलंदाज ठरले होते. (happy birthday shaun pollock, cricketer who made most centuries at no.9)
यासोबतच २००७ मध्ये त्यांनी भारतीय संघाविरुद्ध खेळताना ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन १३० धावांची खेळी केली होती. त्यावेळी ही ७ व्या क्रमांकावर येऊन खेळलेली सर्वोत्तम खेळी होती. त्यानंतर एमएस धोनीने हा विक्रम मोडला होता. तसेच शॉन पॉलक यांच्या नावे ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वात जास्त शतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्यांनी या क्रमांकावर २ शतक झळकावले आहेत. जे आजवर कोणीही करू शकले नाही. तसेच ते एका डावात ९९ धावा करून नाबाद राहणारे कर्णधार देखील होते.
शॉन पॉलक यांनी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात पहिले ४ षटक जलद गोलंदाजी केली होती. त्यांनतर पुढील १४ षटके त्यांनी फिरकी गोलंदाजी केली होती. अर्थातच एका सामन्यात दोन्ही प्रकारे गोलंदाजी करण्याचा अनोखा पराक्रम त्यांनी केला आहे.
शॉन पॉलक यांची कारकीर्द
शॉन पॉलक यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १०८ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी २ शतकांच्या मदतीने ३७८१ धावा केल्या आहेत. यासह त्यांनी ४२१ गडी देखील बाद केले आहेत. तसेच शॉन पॉलक यांनी ३०३ वनडे सामन्यात १ शतक आणि १४ अर्धशतकाच्या मदतीने ३५१९ धावा केल्या. यामध्ये त्यांनी ३९३ गडी बाद केले. तसेच १८६ प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी ७०२३ धावा केल्या. यासह ६६७ गडी देखील बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या-
चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
आजवर श्रीलंकेत फक्त ‘या’ ३ भारतीय कर्णधारांनी ठोकलंय शतक, नवा कॅप्टन धवन करेल हा पराक्रम?