भारतीय संघातील फिरकीपटूंची उत्कृष्ट जोडी म्हणून ओळखली जाणारी ‘कुलचा’ जोडी म्हणजेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल जोडी आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात रविंचंद्र अश्विनने पुनरागमन केले होते. तसेच, वरुण चक्रवर्ती आणि राहुल चाहरला संधी देण्यासाठी या प्रमुख गोलंदाजांच्या जोडीला संघातून वगळले गेले होते. मात्र, आता आयपीएलमधील त्यांच्या प्रदर्शनाने त्यांनी राष्ट्रीय संघात पुनरागमनाची दावेदारी ठोकली आहे. भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगनेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने ‘कुलचा’ म्हणजेच कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) जोडीच्या पुनरागमनाला समर्थन दिले आहे. कुलदीप आणि चहल या दोघांनी आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याच कारणास्तव हरभजन सिंगला वाटते की, या फिरकीपटूंच्या जोडीला आगामी टी-२० विश्वचषकात संधी मिळाली पाहिजे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हरभजन म्हणाला की, “मला नाही माहिती की, त्यांनी (निवडकर्ते) ही जोडी का फोडली, जे भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करत होते. मला निश्चितपणे वाटते की, तुम्हाला ‘कुलचा’ जोडीला पुन्हा आणावे लागेल. मला वाटते की, ते भारतीय संघासाठी अप्रतिम गोलंदाज राहिले आहेत. जेव्हा ते एकत्र खेळले आहेत, त्यांनी मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या आहेत. मग ते टी-२० असो, एकदिवसीय असो किंवा कोणताही प्रकार असो, ते एकत्र खेळले आणि खूप यशस्वी ठरले.”
आयपीएलच्या चालू हंगामात कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स, तर युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत चहल सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादव या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने हंगामात आतापर्यंत १८ विकेट्स नावावर केल्या आहेत. चहलने हंगामातील एका सामन्यात हॅट्रिक साधली आणि ५ विकेट्सचा हॉल पूर्ण केला. दुसरीकडे, कुलदीपने दिल्ली कॅपिटल्ससाठी चालू हंगामातील चार सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कारही पटकावला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवराज आणि पीटरसनमध्ये ट्वीटरवॉर, एकाच्या उत्तराला दुसऱ्याकडून वरचढ प्रत्युत्तर; एकदा वाचा
क्या बात! टुचू टुचू बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराचा पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड षटकार