fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२००७ विश्वचषकात ‘हा’ भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध होता प्रचंड दबावात

harbhajan singh com in to depression in world cup final match

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७ साली आयसीसी टी-२० विश्वकरंडकातील अंतिम सामना ऐतिहासिक झाला होता. अंतिम षटकात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत विश्वकरंडकावर आपली मोहर लावली होती. या सामन्यात असा एक क्षण आला होता, ज्यात भारताचा पराभव होईल असे वाटत होते. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर मिसबाह उल-हकने तब्बल १९ धावा काढून सामना पाकिस्तानकडे झुकला होता. या सामन्याची आठवण सांगताना हरभजन सिंग म्हणाला की माझ्या कारकिर्दीतील सर्वात तणावग्रस्त सामना होता.

हरभजन सिंह एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला की, वर्ल्डकपच्या या अंतिम सामन्यात मी तणावात होतो. फलंदाजाने षटकार खेचला की मी तणावात यायचो. पुढे काय करायचे हे मला समजत नव्हते. फक्त षटक पूर्ण करायचे यावर लक्ष देत होतो. कोणताही फलंदाज सहज चौकाराने षटकार मारू शकतो त्यावेळी आपल्याला योग्य त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कधी कधी षटकार मारल्यानंतर गोलंदाजाला भीती देखील वाटते.

हरभजनने मिस्बाह विरुद्ध आखलेल्या रणनीतीविषयी सांगताना म्हणाला की, ऑस्टेलियाच्या मागील सामन्यात यॉर्कर चेंडूवर मी विकेट घेतली होती. तीच रणनीती मिस्बाहच्या विरोधात करण्याचे मी नियोजन केलो. परंतु माझा हा प्लॅन फेल गेला. त्यामुळे माझ्या षटकात भरपूर धावा रचल्या गेल्या . पाकिस्तानला विजयासाठी २४ चेंडूत ५४ धावांची गरज होती. मिस्बाहने सतराव्या शतकातील पहिल्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारला

आठराव्या शतकात षटकात पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने श्रीशांतच्या पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर छक्का मारला आणि शेवटच्या चेंडूवर श्रीसंतने  तनवीरला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तानला १२ चेंडूत  २० धावांची गरज होती. त्यानंतर आर. पी. सिंगने सुरुवातीच्या तीन चेंडूंवर तीन धावा आणि एक गडी बाद केला. मोहम्मद आसिफने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला.

पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर मिस्बाहने छक्का मारल्यानंतर श्रीशांतला झेल देऊन बाद झाला आणि भारत आयसीसी टी२०चा विश्वकरंडक पहिल्यांदा जिंकला.

You might also like