पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचा सर्वात मोठा जबाबदार युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला मानले जात आहे. अर्शदीपने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले, परंतु मोक्याच्या क्षणी त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांचा सोपा झेल सोडला आणि पराभवाचा खलनायक ठरला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपवर भरपूर टीका होत आहे. मात्र माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरला आहे.
अर्शदीपने (Arshdeep Singh) पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली (Asif Ali Catch) याचा सोपा आणि महत्त्वपूर्ण झेल सोडला. पाकिस्तानच्या डावातील अठराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आसिफने साधारण फटका मारला होता. यावेळी क्षेत्ररक्षक अर्शदीपकडे तो झेल टिपत आसिफला शून्य धावेवर परत पाठवण्याची संधी होती. परंतु अर्शदीपच्या (Arshdeep Singh) हातून तो सोपा झेल सुटला. त्यानंतर आसिफने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या, ज्या पाकिस्तानच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. याच कारणामुळे अर्शदीपवर टीका होत आहे.
Stop criticising young @arshdeepsinghh No one drop the catch purposely..we are proud of our 🇮🇳 boys .. Pakistan played better.. shame on such people who r putting our own guys down by saying cheap things on this platform bout arsh and team.. Arsh is GOLD🇮🇳
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 4, 2022
परंतु हरभजनने टिकाकारांना अर्शदीपवर निशाणा न साधण्याची विनंती केली आहे. हरभजनने ट्वीट करत लिहिले की, “अर्शदीप सिंगवर बोट उचलणे बंद करा. कोणीही मुद्दाम झेल सोडत नसते. पाकिस्तानने चांगले क्रिकेट खेळले. हे लाजिरवाणे आहे की, काही लोक आमच्या संघाबद्दल आणि अर्शदीपबद्दल सोशल मीडियावर घाणेरड्या गोष्टी बोलत आहेत. अर्शदीप सोनं आहे.”
My request to all Indian team fans. In sports we make mistakes as we r human. Please don’t humiliate anyone on these mistakes. @arshdeepsinghh
— Mohammad Hafeez (@MHafeez22) September 4, 2022
पाकिस्तानी दिग्गजाचाही अर्शदीपला पाठिंबा
केवळ हरभजनच नव्हे तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज हादेखील अर्शदीपच्या बाजूने बोलला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “समस्त भारतीय चाहत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही माणसे आहोत आणि माणसांकडूनच चुका होतात. खेळात अशा चुका होत असतात. अशा चुकांवरून कृपया कोणाचाही अपमान करू नका.” असे लिहित हाफिजने अर्शदीपला टॅग केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामागचे कारण कॅप्टन रोहितने केले स्पष्ट; म्हणाला, ‘हार्दिक आणि पंतच्या विकेट…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!
धोनी, कोहलीने जे कमावलं, ते रोहितने झटक्यात गमावलं; 8 वर्षांनंतर पाकिस्तानने भारताला झुकवले