मागील वर्षभर संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना वायरसवर लस तयार झाली असून,तिचा वापर करण्यास देखील सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशासाठी ही आनंदाची बाब मानली जात असून, सर्व स्तरातून शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. मात्र यादरम्यानच क्रिकेटर हरभजन सिंगने कोरोना लस संदर्भात एक वादग्रस्त ट्विट करून सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे. मात्र आपली चूक समजल्यानंतर त्याने जाहीर माफी देखील मागितली आहे.
हरभजनने प्रथमता एक फोटो शेअर करत ट्विट केले की, ” वास्तवात अशाप्रकारे आपले अधिकारी स्वतः कोरोना लस न घेता, केवळ लस घेतल्याचा फोटो प्रसिद्ध करत दिखावा करत आहे.” हरभजनने केलेल्या ट्विटमध्ये एक महिला अधिकारी कोरोना लस न घेता केवळ फोटो प्रसिद्ध करत होती. मात्र हरभजनच्या या ट्विटवर चाहत्यांनी प्रचंड टीका करत हे ट्विट चुकीचे असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी हरभजनला यासंदर्भात ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली होती.
काही कालावधीनंतर हरभजनला आपली चूक लक्षात आली व त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे. हरभजन ने स्पष्ट केले की, आपण पूर्ण सत्यता जाणून न घेता ट्विट केले होते.
My Apologies guys didn’t check the facts ???????? https://t.co/UvwPSkIm0m
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 22, 2021
हरभजनने शेअर केलेल्या फोटोमधील अधिकाऱ्यांची संपूर्ण माहिती मिळवली असता लक्षात आले की, त्या अधिकाऱ्यांनी वास्तवात लस घेतलेली आहे. अधिकाऱ्यांनी केवळ जनजागृतीसाठी तशा प्रकारे फोटो काढलेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –