शेख जायेद स्टेडियममध्ये गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला. यासह त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान गाठले आहे. या सामन्यात देखील व्यंकटेश अय्यरने तुफान फटकेबाजी केली. दरम्यान त्याने मारलेला एक षटकार पाहून त्याचा संघ सहकारी आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग भलताच खुश झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यर हा सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात नाबाद ४१ धावांची खेळी केली होती. तर मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याने ३० चेंडूंमध्ये ५३ धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले होते.
अय्यरने डावाची सुरुवात देखील षटकार मारूनच केली होती. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या डावातील पहिल्याच षटकात त्याने जबरदस्त पुल शॉट खेळत गगनचुंबी षटकार मारला होता. हा षटकार पाहून डगआऊटमध्ये बसलेला हरभजन सिंग उठून टाळ्या वाजवू लागला. इतकेच नव्हे तर, हा शॉट पाहून त्याला ‘बेन स्टोक्स’ची देखील आठवण आली होती. हरभजन सिंगचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Gawd_Dhuni/status/1441081429517946883?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1441081429517946883%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fvenkatesh-iyer-hits-six-of-trent-boult-bhajji-got-excited-in-dug-out-video-84236
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून सलामीवीर फलंदाज क्विंटन डीकॉकने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १५५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने नाबाद ७४ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ५३ धावांचे बहुमूल्य योगदान देत, हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
थरारक विजयानंतर केकेआरच्या संघनायकाला जबर धक्का, २४ लाखांचा झाला दंड; पुन्हा चूकल्यास…
आयपीएलच्या धुमधडाक्यात ‘या’ क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनामुळे परतला घरी