भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) याची क्रिकेट कारकीर्द खूपच मोठी आहे. त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना, संघाला अनेकदा महत्वाच्या वेळी चांगले प्रदर्शन करून विजय मिळवून दिले आहेत. हरभजन सोशल मीडियावर नेहमी सतर्क असतो, तसेच चाहत्यांसाठी अनेकदा फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर करत असतो. आता त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे दोन जुने सहकारी देखील दिसत आहे. हरभजनने फोटोतील त्याचे हे दोन सहकारी कोण आहेत, याचा चाहत्यांना शोध घ्यायला सांगितला आहे.
हरभजनने शेअर केलेला फोटो १९९८-९९ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकादरम्यानचा आहे. हरभजनने स्वतः या गोष्टीची माहिती दिली आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ओळखले तर मानतो… अंडर १९ विश्वचषकातील दिवस १९९८-९९.” दरम्यान, फोटोत हरभजन सोबत जे दोन खेळाडू दिसत आहेत त्यांची प्रत्येक चाहत्याला ओळख पटली असेलच, असे नाही. या दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घातली आहे, तर दुसऱ्या खेळाडूने शर्ट घातलेला नाही.
फोटोतील हरभजन सोबतचे हे दोन खेळाडू म्हणजे, पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज हसन रजा आणि बिना शर्टचा जो खेळाडू दिसत आहे, तो म्हणजे दक्षिण अफ्रिका संघाजा दिग्गज फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर. या दोघांसोबत हरभजनने फोटोसाठी पोज दिलेली आहे. हा फोटो दक्षिण अफ्रिकेत आयोजित केल्या गेलेल्या १९९८-९९ विश्वचषकादरम्यान काढला गेला होता. हरभजनने आता या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले आहे.
ताहिर दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळण्यापूर्वी पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करत होता. तो सध्या दक्षिण अफ्रिका संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत २० कसोटी, १०७ एकदिवसीय आणि ३८ टी२० सामन्यांमध्ये दक्षिण अफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच हसन रजाने पाकिस्तानसाठी १९९६ ते २००५ दरम्यान ७ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांचे प्रतिनिधित्व केले आहे.
दरम्यान, हरभजनच्या (४१७) कारकिर्दीचा विचार केला तर, तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विनने (४२७) नुकतेच त्याला या यादीत मागे टाकले आणि तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादित अनिल कुंबळे (६१९) आणि कपिद देव (४३४) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: हरभजन करणार निवृत्तीची घोषणा? आयपीएलमध्ये मेंटर बनण्याची आली ऑफर
हरभजन सिंगने निवडली कसोटीतील सर्वकालिक ‘प्लेइंग ११’, या खेळाडूला दिली विवियन रिचर्ड्सची उपाधी
सौरव गांगुलीचा तो फोन कॉल आला अन् विराटला बसला आश्चर्याचा धक्का; वाचा नक्की काय झालं