भारत आणि पाकिस्तान या देशांतील राजकीय वैराचे ठसे क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून हे प्रतिस्पर्धी संघ केवळ आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमध्ये आमने सामने आलेले दिसतात. पण भलेही भारत-पाकिस्तान संघातील क्रिकेटपटू मैदानावर कट्टर प्रतिसपर्धी असतील, मात्र मैदानाबाहेर त्यांच्यात चांगलीच मैत्री असल्याचे दिसून येते. अनेक असे किस्से आहेत, जे त्यांच्यातील बंधुतेची आठवण करुन देतात.
असाच एक किस्सा २०११ सालच्या विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यावेळी घडला होता. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (भज्जी) याने त्या किस्स्याची आठवण ताजी केली आहे.
भारतीय संघाने विश्वचषक २०११ च्या उपांत्य फेरी सामन्यात पाकिस्तानला चितपट करत अंतिम फेरीत धडक मारली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाची अंतिम लढत रंगली होती. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेली ही लढत जिंकत भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
उपांत्य सामन्यावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने हरभजनकडे सामन्याचे तिकीट मागितले असता; त्याने ते दिले होते. परंतु अंतिम सामन्याचे तिकिट मागितल्यावर हरभजनने अख्तरला गमतीशीर उत्तर दिले होते.
पाकिस्तान नाही भारत अंतिम सामना खेळणार आहे
हरभजनने ‘स्पोर्ट्स टुडे’ला त्या मजेशीर किस्स्याची आठवण सांगताना म्हटले की, “विश्वचषक २०११ मधील उपांत्य सामन्यापुर्वी अख्तर मला भेटायला आला होता. तो उपांत्य फेरी सामन्यातून बाहेर होता. यावेळी त्याने भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य सामन्याचे तिकीट मला मागितले होते. मी जुळवाजुळव करत त्याला ४ तिकिटे दिली होती. त्यानंतर अंतिम सामन्यावेळीही तो मला तिकीट मागण्यासाठी आला होता. यावेळी मी त्याला गमतीने म्हणालो, तू तिकीटांचे काय करशील? अंतिम सामना पाकिस्तान नाही भारत खेळणार आहे. जर तुला खरोखरच सामना पाहायचा असेल तर मी तुला २-४ तिकीट देईन.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचे १३ हंगाम लोटले, पण ‘या’ दोन संघांची प्रतिक्षा काही संपेना
‘काळजीची आवश्यकता नाही,’ बालपणीच्या मित्राने दिली सचिनच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहीती