आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघ शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्यांनी सातत्याने विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या तीन क्रमांकावर आपली जागा निश्चित ठेवली आहे. संघाच्या या यशात कर्णधार एमएस धोनी याचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. आयपीएल इतिहासातील सर्वात अनुभवी कर्णधार असलेल्या धोनीबद्दल आता त्याचा सहकारी राहिलेल्या हरभजन सिंग याने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
हरभजन सध्या आयपीएल दरम्यान समालोचकाची भूमिका निभावताना दिसतोय. हरभजन दोन वर्ष चेन्नई संघाचा भाग राहिला होता. त्यावेळेसचे आपले अनुभव समालोचनादरम्यान त्याने शेअर केले. सीएसकेचा कर्णधार धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला,
“धोनी आता त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून तो काहीतरी वेगळे करताना दिसतोय. मी त्याच्याबद्दल सांगायचे झाले तर धोनी हंगाम सुरू होताना 15 बॅट घेऊन येतो. त्याच्याकडे दोन किट बॅग असतात. एक किट बॅग हॉटेलवर तर दुसरी त्याच्यासोबत मैदानावर असते. धोनी ज्या 15 बॅट घेऊन येतो त्या हंगाम संपेपर्यंत तीन-चारच राहतात. अनेक खेळाडू त्याच्याकडे बॅट मागतात. धोनी त्यांना कधीच नकार देत नाही.”
धोनी खालच्या बाजूने अधिक वजन असलेल्या बॅट वापरण्यास प्राधान्य देतो असे देखील हरभजनने सांगितले.
धोनी सध्या सुरू असलेल्या हंगामा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना त्याने नेहमीच संघासाठी आक्रमक खेळ दाखवला आहे. त्याने चार डावात 59 धावा केल्या असून यादरम्यान तो केवळ एकदाच बाद झाला आहे. त्याच्या बॅटमधून यादरम्यान सहा षटकार व दोन चौकार आले आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 200 पेक्षा अधिक राहिला आहे.
(Harbhajan Singh Reveal MS Dhoni Distribute Bats During IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो हिरा आहे, जो नेहमी जुन्या मित्रांना…’, भज्जीने तोंडभरून केलं रोहितचं कौतुक, तुम्हीही वाचाच
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या साहित्याचा लागला शोध, लाखोंच्या बॅट गेलेल्या चोरीला, दिल्ली पोलिसांनी 48 तासात लावला छडा