भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण असे असले तरी तो आयपीएलचा भाग आहे. त्याने आयपीएलमधील आपल्या भविष्याबाबत मोकळेपणाने चर्चा केली आहे. तो म्हणाला, यावर्षी होणारा आयपीएलचा हंगाम त्याचा शेवटचा असेल की नाही हा निर्णय त्याचे शरीर घेईल.
“हा माझा शेवटचा आयपीएल असेल की नाही हे मी सांगू शकत नाही. हे माझ्या शरीरावर अवलंबून आहे. ४ महिन्यांच्या वर्कआऊट, विश्रांती आणि योगा सेशननंतर मला २०१३ प्रमाणे वाटत आहे, जेव्हा मी आयपीएलच्या एका मोसमात २४ विकेट्स घेतल्या होत्या,” असे हरभजन म्हणाला.
“प्रत्येकाची स्वतःची प्रवृत्ती असते. सामन्यांसाठी कोणाला वेळ हवा आहे, असे वाटत असल्यास, ते त्याच्यासाठी चांगले आहे. जर मी एका महिन्यात नेट्समध्ये २००० चेंडू नेट्समध्ये फेकत असेल तर मी उच्च स्तरीय क्रिकेट खेळण्यासारखे आहे आणि ते चांगले आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत हरभजनचा तिसरा क्रमांक लागतो. त्याने १६० सामने खेळताना २६.४४ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत.
हरभजनने तब्बल १० मोसमात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर २०१८ पासून तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. २००८ ते २०१७ पर्यंत हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यामध्ये मुंबईने ३ वेळा विजेतेपद पटकाविले.
हरभजन कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा भारतीय संघाचा पहिला गोलंदाज आहे. त्याने २०१६ मध्ये आशिया चषकादरम्यान भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. अनिल कुंबळे (६१९) आणि कपिल देव (४३४) यांच्यानंतर हरभजन कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
हरभजनने भारतीय संघाकडून १०३ कसोटी सामने, २३६ वनडे सामने आणि २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ४१७ विकेट्स, वनडेत २६९ विकेट्स आणि टी२०त २५ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अंधश्रद्धाळू असलेले ५ भारतीय खेळाडू; एकाने तर संपूर्ण कारकीर्दीत नवीन बॅट वापरलीच नाही
-धोनीवर लावला जातो या पाच खेळाडूंचे करियर संपविल्याचा आरोप
-सौरव गांगुली या ३ कारणांमुळे होऊ शकणार नाही आयसीसीचा पुढील अध्यक्ष