आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी निवडलेला संघ पत्रकार परिषद घेऊन घोषित केला गेला. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू आशिया चषकासाठी संघात पुनरागमन करणार आहेत. मात्र, फिरकीपटू युजवेंद्र चहल याला या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याची पाठराखण केली.
कुलदीप यादव याच्यासह संघात निवडले जाण्याची अपेक्षा असताना चहल याचा आशिया चषकात समावेश केला गेला नाही. त्याला डावलल्यामुळे हरभजन निराश झाला. तो म्हणाला,
“मला विचाराल तर आशिया चषकात चहल गरजेचा होता. जेव्हा तुम्ही खरा स्पिनर पाहता तेव्हा तो चहलच्या रुपात दिसतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार केला तर आत्ता तो भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू आहे.”
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा चहलला महत्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाहीये. आयसीसी टी20 विश्वचषक 2021 पासून तो अशा महत्वाच्या स्पर्धांना मुकला आहे. 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात त्याला संघात स्थान मिळाले होते. मात्र, अंतिम अकरामध्ये चहलला संधी मिळाली नव्हती. चहलने भारतीय संघासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 96 तर वनडे क्रिकेटमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन
(Harbhajan Singh Said Yuzvendra Chahal Is Indias Limited Overs Best Spinner)
हेही वाचा-
धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूने घेतली त्यांची जागा, World Cupपूर्वी अश्विनचा मोठा दावा
अफगाणी गोलंदाजाने शादाबला धाडलं तंबूत, ‘मंकडिंग’चा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल!