भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली १५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रसंगी त्याला सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत. तरीही रैनाच्या या विशेष प्रसंगी भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने रैना हरवला असल्याचे पोस्टर तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्याच्या या पोस्टवर रैनाने नाही परंतु शिखर धवनने कमेंट करत रैना हरवल्याचे कारण सांगितले आहे.
हरभजन सिंगने शेअर केला फोटो
हरभजनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये रैनाचा फोटो आहे. आणि त्याच्या वरच्या भागात मोठ्या अक्षरात लिहिले आहे की, या वर्षी मार्चपासून हा व्यक्ती हरवला आहे.
फोटोच्या खाली रैनाच्या नावाबरोबरच त्यात लिहिले आहे की, “जेवण कसे बनवायचे हे कदाचित रैना शिकला आहे. परंतु तो कदाचित विसरला आहे की मेसेज कसा केला जातो. जर याची काही माहिती मिळाली, तर शेअर करा.”
हरभजनने फोटोला कॅप्शन देत लिहिले, “दीर्घ काळापासून माझा रैनाबरोबर संवाद झालेला नाही. कदाचित तो कारकिर्दीचे १५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंद साजरा करण्यात व्यस्त आहे. जर तुम्हाला कुठे हा भेटला, तर माहिती शेअर करा.”
हरभजनच्या फोटोवर सलामीवीर फलंदाज धवनने कमेंट करत लिहिले, “लग्नानंतर सर्वजण असेच गायब होतात, हो ना पाजी.”
श्रीलंकेविरुद्ध केले होते रैनाने पदार्पण
३० जुलै २००५ म्हणजेच १५ वर्षांपूर्वी रैनाने भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध दांबुला येथे आपला पहिला वनडे सामना खेळला होता. रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे, ज्याने कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक ठोकले आहे.
त्याने भारतीय संघाकडून १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७६८, वनडेत ५६१५ आणि टी२०त १६०५ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये एक शतक आणि ३८ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
-अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
-वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
ट्रेंडिंग लेख –
-४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
-लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
-या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल