---Advertisement---

4 महिन्यातच दिग्गजाने दिला राजीनामा, भारतीय खेळाडूची भविष्यवाणाी ठरली खरी!

---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) काही दिवसांपासून गोंधळ उडाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी 6 महिन्याच्या आतच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. 2011 मध्ये ते भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. यंदा तो पाकिस्तानचा प्रशिक्षक झाला तेव्हा भारतीय चाहत्यांना ते आवडले नाही.

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही (Harbhajan Singh) त्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करण्यास सांगितले होते. आता कर्स्टनने पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने हरभजनचा अंदाज खरा ठरला आहे.

2024च्या टी20 विश्वचषकातून पाकिस्तान लवकर बाहेर पडल्यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) सोशल मीडियावर कर्स्टनबद्दल पोस्ट केली होती. तो एक्सवर म्हणाला होता, “गॅरी तुझा वेळ वाया घालवू नकोस… परत ये आणि भारतीय संघाचा प्रशिक्षक हो. गॅरी कर्स्टन एक दुर्मिळ रत्न आहे. 2011च्या विश्वचषक विजेत्या संघातील सर्वांचा मित्र. खास माणूस गॅरी.”

कर्स्टन यांची पाकिस्तानने वनडे आणि टी20 प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तान संघाने एकही वनडे सामना खेळला नाही. कर्स्टनच्या राजीनाम्यानंतर एका चाहत्याने हरभजनला त्याच्या पोस्टची आठवण करून दिली. त्यावर हरभजनने हसणारा इमोजी शेअर केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या संघात ‘या’ विस्फोटक खेळाडूची एँट्री
IND vs NZ; भारताविरूद्ध घातला होता धुमाकूळ! मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंड फिरकीपटू भावूक
Champions Trophy 2025; पाकिस्तान कर्णधाराला झाली भारताची आठवण! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---