इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. नुकतेच शुक्रवारी (२१ जानेवारी) आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद आणि लखनऊ फ्रँचायझींनी आपल्या संघात सामील केलेल्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये सीव्हीसी कॅपिटल्स या प्रसिद्ध कंपनीकडे मालकी असलेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदही सोपवल्याची घोषणा केली आहे, तर आरपी संजीव गोयंका ग्रुपची मालकी असलेल्या लखनऊ संघाने केएल राहुल याला कर्णधारपदी बसवले आहे. यानंतर हार्दिक आणि राहुल यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या संघाकडून खेळण्यास उत्सुक – हार्दिक पंड्या
स्टार स्पोर्ट्सने ट्वीटरवर हार्दिकचा (Hardik Pandya) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये हार्दिकने म्हटले आहे की, ‘नवीन आयपीएल संघ अहमदाबादबरोबर प्रवास करण्यास उत्सुक आहे. मी अहमदाबाद फ्रँचायझीने दिलेल्या जबाबदारीबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो.’
तसेच हार्दिकने असेही म्हटले की, सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. याबरोबरच त्याने त्याच्यासह अहमदाबादने संघात घेतलेल्या राशिद खान आणि शुबमन गिलचे स्वागत केले. तो म्हणाला की, या दोन्ही खेळाडूंना खूप चांगले ओळखतो. त्यांच्यावर विश्वास आहे. त्याचबरोबर हार्दिकने हे नवे पर्व असून स्पर्धेत खेळण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले.
Kem cho Ahmedabad ???????? pic.twitter.com/ZsuaX6PADY
— hardik pandya (@hardikpandya7) January 22, 2022
अहमदाबादने (Ahmedabad Team) हार्दिकव्यतिरिक्त युवा क्रिकेटपटू राशिद खान आणि शुबमन गिल यांनाही संघात स्थान दिले आहे. अहमदाबादने हार्दिक व राशिद यांना प्रत्येकी १५ कोटी, तसेच शुबमन गिलला ८ कोटी रकमेमध्ये करारबद्ध केले गेले आहे.
अधिक वाचा – नवा डाव! कर्णधार म्हणून नवी जबाबदारी सांभाळण्यास हार्दिक सज्ज
केएल राहुलचाही खास संदेश
आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) लखनऊ संघाचे (Lacknow Team) नेतृत्त्व करणार असलेल्या केएल राहुलचा व्हिडिओ संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये केएल राहुलने म्हटले आहे की, लखनऊ संघाचा भाग बनून त्याला आनंद होत आहे. तसेच त्याने कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल फ्रँचायझीचे आभार मानले. त्याचबरोबर त्याने लखनऊमधील चाहत्यांसाठी चांगले क्रिकेट खेळायचे आहे, असंही म्हटले.
लखनऊ संघाने केएल राहुलबरोबर (KL Rahul) ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि युवा भारतीय गोलंदाज रवी बिश्नोईला संघात स्थान दिले आहे. फ्रँचायझीने केएल राहुलसाठी १७ कोटी, स्टॉयनिससाठी ९.२ कोटी व बिश्नोईसाठी ४ कोटी रुपये मोजले आहेत.
KL Rahul ???? Team Lucknow.
लखनऊ वालों, कप्तान का फरमान आ गया है| ????????
@klrahul11 @rpsggroup #TeamLucknow #IPL2022 pic.twitter.com/Iqna33xxQo
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 22, 2022
कर्णधारपदासाठी हार्दिक अननुभवी, तर केएल अनुभवी
हार्दिकने आयपीएलमध्ये यापूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व केले आहे. पण आता तो पहिल्यांदाच मुंबई व्यतिरिक्त दुसऱ्या संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे. इतकंच नाही, तर तो अहमदाबादच्या कर्णधाराच्या रुपात खेळणार आहे. असे असले तरी, हार्दिकला नेतृत्त्वाचा अनुभव नाही. त्यामुळे आता तो अहमदाबाद संघाचे नेतृत्त्व कशाप्रकारे करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?
दुसरीकडे, केएल राहुलने २०२० आणि २०२१ आयपीएल हंगामात पंजाब किंग्स संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे नेतृत्त्व केले आहे. त्यामुळे, केएल राहुल त्याच्या अनुभवाचा फायदा लखनऊ संघासाठी कसा करतो, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयकडून विराटला मिळणार होती कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने दिले स्पष्टीकरण
जिथे धोनी, गांगुलीसारखे कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या पेपरमध्ये झालेत फेल, तिथंच विराट आलाय अव्वल