Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकदा नाही ‘इतक्या’ वेळा हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध घेतल्यात तीन विकेट्स, बनला खास यादीतील एकमेव भारतीय

एकदा नाही 'इतक्या' वेळा हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध घेतल्यात तीन विकेट्स, बनला खास यादीतील एकमेव भारतीय

October 23, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
hardik pandya

Photo Courtesy: Twitter/BCCI


रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार पाहायला मिळाला. भारतीय  गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होते. हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी या महामुकाबल्यात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचे कर्णधार स्वस्तात बाद झाल्यामुळे संघाची धावगती सुरुवातील संथ पडली होती, पण शेवटच्या षटकांमध्ये त्यांच्या फलंदाजांनीही तापडतोड खेळी करत अपेक्षित धावसंख्या गाठली. 

पाकिस्तानने या सामन्यातन नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. मर्यादित 20 षटकांमध्ये पाकिस्तानने 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने स्वतःच्या चाक षटकांमध्ये 30 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या चार षटकार 32 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतासाठी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येक एक-एक विकेट घेतली. हार्दिक पंड्यासाठी ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्ध अशा पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक वेळा तीन विकेट्स घेणारे खेळाडू
पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा तीन विकेट्सचा हॉल घेणाऱ्यांमध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हार्दिकने तीन वेळा ही कामगिरी केली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर टीम साउदी आहे, ज्यांनी पाकिस्तानविरुद्ध चार टी-20 सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले आहेत.  यादीत दुसऱ्या क्रमांकावरील हार्दिक पंड्या पाकिस्ताविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. यादीतील तिसऱ्या क्रमांकावर लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने देखील पाकिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली आहे. एंड्र्यू टाय यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अक्षरने देखील तीन टी-20 सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा तीन विकेट्सचा हॉल घेणारे खेळाडू 
4 – टिम साउदी
3 – हार्दिक पंड्या
3 – लसिथ मलिंगा
3 – एंड्र्यू टाय

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकदा नाही ‘इतक्या’ वेळा हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध घेतल्यात तीन विकेट्स, बनला खास यादीतील एकमेव भारतीय
भारी रे! 2021 विश्वचषकातील ‘त्या’ गोष्टीचा अर्शदीपने असा घेतला बदला  


Next Post
Rohit & Virat asia cup

 टी 20मध्ये 'गोल्डन डक'वर बाद होणारे दुर्दैवी कर्णधार, पाहा किती आहेत भारतीय

Rohit-Sharma-Video

राष्ट्रगीतावेळी रोहित झाला भावूक, पाकिस्तानविरुद्ध मैदानात उभा असताना डोळे बंद करून रडला कर्णधार

Photo Courtesy: Twitter

दुबळ्यांविरूद्ध शेर बलाढ्यांविरूद्ध ढेर! पाहा केएल राहुलची लाजिरवाणी आकडेवारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143