ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणाऱ्या टी20 विश्वचषक (T20 World Cup)स्पर्धेबाबत अनेक दिग्गज आपापली मते व्यक्त करत आहेत. कोणता खेळाडू चांगला खेळणार, कोण आपली जबाबदारी कसा पार पाडणार याबाबत चर्चा केली जात आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस यांनी दोन अष्टपैलू खेळाडू असे आहेत जे आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करू शकतात, असे विधान केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस (Jack Kallis) याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) हे जबरदस्त कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कॅलिस म्हणाले, हार्दिक आणि स्टोक्स हे दोघे विश्वतील अष्टपैलू आहेत. अष्टपैलू खेळाडू असे असतात जे खूप कमी वेळा संघाला भेटतात यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. मला माहित आहे की हे दोघे संघासाठी प्रमुख भुमिका निभाऊ शकतात.
सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. ही मालिका आगामी टी20 विश्वचषकासाठी महत्वाची मानली जात आहे. विश्वचषकामध्ये स्थिती वेगळी असणार आहे, मात्र तरीही ही मालिका महत्वपूर्ण आहे. या मालिकेत काहीही होऊ दे कर्णधार टेम्बा बावूमा याने आपले लक्ष विश्वचषकावर केंद्रीत करावे, असा सल्लाही कॅलिसने दिला आहे.
हार्दिक हा 2021च्या टी20 विश्वचषकात खेळला, मात्र त्याने दुखापतीमुळे काही सामन्यांमध्ये केवळ फलंदाजीच केली. त्याने पाकिस्तान विरुद्ध गोलंदाजी केली नव्हती, यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद जिंकून दिले. तेव्हापासून तो भलताच फॉर्ममध्ये आहे. तो सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या टी20 मालिकेत संघात उपस्थित नाही.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने काही दिवसांपूर्वीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर तो टी20 विश्वचषक झाल्यावर टी20मधूनही निवृत्ती घेईल अशा चर्चा सुरू आहेत. क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे, तसेच तो मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करत आला आहे. यामुळे टी20 विश्वचषकात निश्चितच त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहच्या फिटनेसविषयी चांगली बातमी; स्ट्रेस फ्रॅक्चर नाही, ‘ही’ साधी दुखापत झालीये
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता
INDvSA: फॅन्ससाठी वाईट बातमी, दुसरा टी20 सामना होणार रद्द?