Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मानलं हार्दिकच्या कॅप्टन्सीला! अखेरच्या षटकात खेळलेला जुगार ठरला फायद्याचा; विजय झाला सुकर

January 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Indian-Cricket-Team

Photo Courtesy: Twitter/ICC


मंगळवारी (दि. 03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारतीय संघाने 2 धावांनी आपल्या नावावर केला.  हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  मात्र, या सामन्यात नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात घेतलेल्या धाडसी निर्णयाने सामन्याचा निकाल बदलला.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन (37), कर्णधार हार्दिक पंड्या (29),  दीपक हुडा (41 नाबाद) व अक्षर पटेल (नाबाद 31) यांच्या योगदानाच्या जोरावर 5 बाद 162 धावा बनवल्या.

वर्षातील पहिला सामना खेळत असलेल्या या दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्न केले. 163 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला नियमित अंतराने धक्के बसले. पदार्पण करणाऱ्या शिवम मावी याने चार बळी घेत श्रीलंकेची वाताहात केली. उमरान मलिकनेही 2 बळी आपल्या नावे केले. असे असतानाही श्रीलंकेला विजयासाठी अखेरच्या षटकात 2, गडी व12 धावांची गरज होती.

हे षटक टाकण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्याकडे स्वतः युजवेंद्र चहल अक्षर पटेल हे पर्याय होते. त्याने अक्षरकडे चेंडू देत सर्वांना चकित केले. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकल्याने सर्वांची धाकधुकी वाढली. त्यानंतर त्याने एक धाव आणि पुढील चेंडू निर्धाव टाकत पुनरागमन केले. मात्र, करूणारत्ने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवला.

अक्षरने पुन्हा निर्धाव चेंडू टाकल्याने सामन्यातील रंगत वाढली. पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात रजिथा धावबाद झाला.‌ त्यानंतर सामना एक चेंडू चार धावा असा आलेला असताना, अक्षरने एकच धाव देत करूणारत्ने याला धावबाद करत संघाला एका धावेने विजय मिळवून दिला.

(Hardik Pandya Brave Decision Axar Bowl Last Over)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या नवीन वर्षाची सुरुवात दिमाखात! श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत मोडला विस्फोटक सेहवागचा विक्रम
फलंदाजाला गेला नडायला, पण नियम माहिती नसल्याने झम्पाची झाली फजिती; पाहा व्हिडिओ


Next Post
Kerala Blasters FC

केरळा ब्लास्टर्सची नव वर्षात विजयी सुरुवात; जमशेदपूरला नमवून गुणतालिकेत तिसरे स्थान

Mumbai City FC

मुंबई सिटीची नवीन वर्षात दमदार सुरुवात; ओडिशाविरुद्धच्या विजयात छांगटे ठरला नायक

Manas Dhamne

15 वर्षीय मानस धामणेची पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत कडवी झुंज

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143