सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) पहिला वनडे सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३७५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याने ९० धावांची झंझावाती खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
हार्दिकने ही ९० धावांची खेळी ७६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह केली. या खेळीदरम्यान त्याने वनडे कारकिर्दीत १००० धावांचा टप्पाही पार केला. हार्दिकने ५५ वनडे सामन्यातील ३९ डावात फलंदाजी करताना ५ अर्धशतकांसह १०४७ धावा केल्या आहेत. त्याने वनडे कारकिर्दीतील ८५७ वा चेंडू खेळताना १००० वी धाव पूर्ण केली.
त्यामुळे तो चेंडूच्या तुलनेत वनडेमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम केदार जाधवच्या नावावर होता. केदारने ९३७ चेंडूत १००० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.
तसेच वनडेमध्ये चेंडूंच्या तुलनेत सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंच्या यादीत हार्दिक पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याने इंग्लंडच्या जॉस बटलरला मागे टाकले आहे. बटलरने ८६० चेंडूत १००० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजचा आंद्रे रसल आहे. रसलने ८६७ चेंडूत १००० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.
वनडेमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी चेंडू खेळणारे क्रिकेटपटू –
७६७ चेंडू – आंद्रे रसल
८०७ चेंडू – ल्यूक राँची
८३४ चेंडू – शाहिद आफ्रिदी
८५४ चेंडू – कोरी अँडरसन
८५७ चेंडू – हार्दिक पंड्या
८६० चेंडू – जॉस बटलर
८६७ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल
९१५ चेंडू – शिमरॉन हेटमायर
९२६ चेंडू – थिसरा परेरा
९३७ चेंडू – केदार जाधव
९४३ चेंडू – कॉलिन मुनरो
सेहवाग, केदारच्या यादीत हार्दिकचा समावेश –
हार्दिकने या १००० धावा १०० पेक्षाही अधिकचा स्ट्राईकरेट ठेवत पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे वनडेमध्ये १०० पेक्षा अधिकचा स्ट्राईकरेट ठेवून १००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो भारताचा केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याच्याव्यतिरिक्त केवळ विरेंद्र सेगवाग आणि केदार जाधवने असा कारनामा केला आहे. सेहवागने १०४.४४ च्या स्ट्राईकरेटने वनडेमध्ये ७९९५ धावा केल्या आहेत. तर केदारने १०१.६० च्या स्ट्राईकरेटने १३८९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नर-फिंच जोडीची कमाल! भारताविरुद्ध केलाय मोठा पराक्रम
अरेरे! भारतीय गोलंदाजांची पिसं काढत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी रचला ‘हा’ विक्रम