Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल गाजवणारे उमरान मलिक आणि संजू सॅमसन खेळणार का तिसरा टी20 सामना? हार्दिकने दिले स्पष्टीकरण

आयपीएल गाजवणारे उमरान मलिक आणि संजू सॅमसन खेळणार का तिसरा टी20 सामना? हार्दिकने दिले स्पष्टीकरण

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Umran Malik and sanju samson

Photo Courtesy-Twitter/BCCI


न्यूझीलंड दौऱ्यावरील भारताचा तिसरा टी20 सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) नेपियर येथे खेळवला जाणार आहेे. भारतीय संघाला आपल्या धोरणात बदल करण्याची गरज आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या या तिसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसन आणि उमरान मलिक या दोघांना संधी मिळेल की नाही हे पाहण्यासारखे राहील. टी20 विश्वचषकात भारताला अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करता आले नाही. मात्र, उपांत्यफेरीच्या लाजीरवाण्या पराभवानंतर संघात बदल बघायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण भारतीय संघाचे व्यवस्थापन पाहिले तर संघ शून्यापासून सुरुवात करायला घाबरत आहे असे संकेत मिळतात.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे वैयक्तिक प्रदर्शन सोडले तर भारताला 160 धावा करण्यातही दमछाक झाली असती. भारताच्या अशी फलंदाजी टी20 विश्वचषकातील पराभवाची आठवण करुन देते, जिथे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी झाला. पॉवरप्लेमध्ये भारताचा भित्रा खेळ चिंतेचा विषय आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात सलामीसाठी ईशान किशन (Ishan Kishan) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांचा वापर करुन बघण्यात आला पण पाहिजे तसे फळ मिळाले नाही. पंतचा स्तर बघता या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

संजू सॅमसन (Sanju Samson) हा आणखी एक फलंदाज आहे, जो लगेच आपला प्रभाव दाखवू शकतो. मात्र, त्याला अजूनही संघात स्थान मिळाले नाही. कर्णधार हार्दिक पांड्या याने सामना संपल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेत म्हणाला की व्यवस्थापन तिसऱ्या सामन्यात जास्त बदल करण्याची शक्यता नाहीये.पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना जिंकत भारताने या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.

वरीष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता होती.सलामीच्या फलंदाजासाठी शुबमन गिल (Shubman Gill) पहिला दावेदार होता. मात्र सलामीसाठी दोनही फलंदाज डावखुरे पाठवल्याने गिलला संघाबाहेर बसावे लागले. शेवटच्या निर्णायक सामन्यात भविष्याचा विचार करुन संघाची बांधणी करण्यात यावी.(Hardik Pandya has given signs that there will be no change in Indian team for third T20 match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! ‘हिटमॅन’चं ‘ते’ ट्वीट व्हायरल
सलामत रहे दोस्ताना हमारा! विराट कोहलीने धोनीच्या आठवणीत केला ‘हा’ फोटो शेअर

 

 


Next Post
Iran Football Team

VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर

Umran-Malik-Hardik-Pandya

न्यूझीलंडविरुद्ध 'बर्थ-डे बॉय' उमरानला मिळणार का संधी? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

Liam Livingstone Jos Buttler & Ben Stokes

पहिले देश, नंतर लीग! इंग्लंडच्या 'या' स्टार खेळाडूची बीबीएलमधून माघार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143