भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पाहुण्या इंग्लंडच्या नावावर झाला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने भारताला पराभवाची धूळ चारली. या सामन्यादरम्यान भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या मोठी आकडी धावसंख्या उभारु शकला नाही. परंतु त्याने दमदार फटकेबाजी करत छोटेखानी खेळी केली. दरम्यान त्याच्या एका अनोख्या शॉटने सर्वांना अचंबित केले.
त्याचे झाले असे की, भारतीय संघाचा डाव चालू असताना इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स पंधरावे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिकने खणखणीत षटकार मारला. त्यामुळे स्टोक्सने हार्दिकची विकेट काढण्याच्या इराद्याने पुढील चेंडूवर अतिशय वेगवान बाउंसर टाकला. यावर हार्दिकने बाउंसरपासून स्वत:ला वाचवत खाली वाकून अपरशॉट मारला.
हा शॉट खेळताना हार्दिक पाठीवर मैदानावर कोसळला. मात्र त्याने मारलेला चेंडू थेट सीमारेषेपार गेला आणि ४ धावांची फलकावर नोंद झाली. हार्दिकच्या या अनोख्या शॉटला पाहून स्टोक्ससह नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला श्रेयस अय्यरही दंग झाला. एवढेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसी देखील हार्दिकच्या शॉटचे कौतुक करण्यापासून स्वतला थांबवू शकले नाही.
आयसीसीने हार्दिकचा अपरशॉट मारतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, हार्दिकच्या या शॉटसाठी नाव सुचवा. क्रिकेटरसिकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मॅट्रिक्स शॉट, पॅरलल ग्राउंड शॉट अशी नावे सुचवली आहेत.
Name this shot from @hardikpandya7 👀#INDvENG pic.twitter.com/4AwJzMTbxa
— ICC (@ICC) March 12, 2021
The Matrix shot 😄
— Sudheesh Suresh (@sudhe_sk) March 12, 2021
Rather it should be 'Parallel back shot' ?
— aamir1682 (@aamir16821) March 12, 2021
The bullet dodge shot pic.twitter.com/T6yxt7Vf6A
— Mo Mo (@LumzanMo) March 13, 2021
हार्दिकने पहिल्या टी२० सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १९ धावांची खेळी केली. २१ चेंडूंचा सामना करताना एक षटकार आणि एक चौकार मारत त्याने ही धावसंख्या उभारली. अखेर १७.२ षटकात जोफ्रा आर्चरने ख्रिस जॉर्डनच्या हातून त्याला झेलबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० मालिका: पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कशी असेल भारताची रणनिती? अय्यरने केला उलगडा
INDvENG : दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो ‘हा’ बदल, पाहा संभावित ११ जणांचा संघ
‘रोहित नसेल तर मी सामना पाहणार नाही’, सेहवागचे पहिल्या टी२० सामन्यानंतर मोठे वक्तव्य