इंग्लंडचा भारत दौरा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला आहे. नुकतीच या दौऱ्यातील कसोटी मालिका पार पडली असून १२ मार्चपासून टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ही मालिका आगामी टी२० विश्वचषक तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू नेटमध्ये कसून सराव करत आहेत. त्यातही भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याच्या सराव सत्रातील व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पंड्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत पंड्याचे वेगळेच रुप पाहायला मिळते. तो नेटमध्ये आक्रमक फटके मारताना दिसत आहे. याबरोबरच तो गोलंदाजीचाही सराव करताना दिसतो आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘सर्व तयारी झाली आहे. मी आता १२ मार्च रोजी मैदानात उतरण्यासाठी आतुर आहे.’
पंड्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशलिस्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. टी२० मालिकेतही त्याने दमदार प्रदर्शन केले होते. मात्र दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसल्याने त्याला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नव्हती.
त्यानंतर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेवेळीही त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु त्याला पूर्ण मालिकेदरम्यान बाकावर बसून राहावे लागले. परंतु येत्या टी२० मालिकेत त्याला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे.
Preparation done ✅????????
Can’t wait to get on the field on 12th ???? pic.twitter.com/Nyr6Bys2EF— hardik pandya (@hardikpandya7) March 9, 2021
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय टी२० संघात ‘या’ फिरकीपटूची एन्ट्री, तेवतिया किंवा चक्रवर्तीच्या जागी मिळणार संधी?
टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार गोलंदाज पहिल्या टी२० सामन्यातून बाहेर? वाचा कारण
टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून विराट-रोहित एक पाऊल दूर, कोण मारणार बाजी?