काल ११५ चेंडूत १७१ धावांची नाबाद खेळी करून भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. परंतु तिच्याबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
गेल्या वर्षी जुलै महिन्यातच ह्याच कालावधीमध्ये हरमनप्रीत कौरबद्दल भारतीय माध्यमे आणि क्रिकेट चाहत्यामंध्ये जोरदार चर्चा झाली होती. कारण ती पहिली अशी भारतीय खेळाडू होती जी परदेशी टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी करारबद्ध झाली होती. ऑस्ट्रेलियामधील सिडनी थंडर या क्लबने तिला बिग बॅश लीगसाठी करारबद्ध केले होते.
हरमनप्रीत कौरबद्दल थोडस:
१. हरमनप्रीत कौरचा जन्म मोगा, पंजाब येथे झाला आहे.
२. ती सध्या २८ वर्ष आणि १३५ दिवस वयाची आहे.
३. सेहवाग आणि रहाणे तिचे बॅटिंग आयडॉल आहेत.
४. ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे जिने इंग्लंडमधील किवा सुपर लीगमधील सरे स्टार्ससाठी करारबद्ध झाली.
५. ती पंजाब संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.