भारतीय महिला क्रिकेट संघ गुरुवारपासून (३० सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. परंतु, या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीआधीच भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर गुरुवारपासून गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटीतून बाहेर झाली आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना कर्णधार मिताली राजने या बातमीस दुजोरा दिला आहे.
हरमनप्रीत कौरच्या खेळण्याबाबत विचारले असता मिताली म्हणाली, ती या कसोटी सामन्याबाहेर झाली आहे. हरमनप्रीतने तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली नव्हती. ही एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली होती. ती अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सहभागी झालेली उजव्या हाताची फलंदाज पूनम राऊत किंवा युवा खेळाडू यास्तिका भाटिया या दोघींपैकी एक हरमनप्रीतची जागा घेऊ शकतात.
मितालीने पहिले सत्र चांगले हाताळण्यावर भर देण्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, ‘गुलाबी चेंडूसह आमचे पहिले सराव सत्र काल होते. प्रत्येकाला वेगळा अनुभव आला, कारण आम्हाला गुलाबी चेंडूची सवय नाही, चेंडू खूप पुढे येतो. भारताला संघाचा समतोल राखायचा निर्णय घ्यावा लागेल.’ मिताली भारताच्या वेगवान आक्रमणाच्या कामगिरीने खूप प्रभावित झाली आहे.
ती पुढे म्हणाली, ‘एकदिवसीय मालिकेत तीन वेगवान गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याबद्दल आम्ही खूप खूश आहोत. झुलन सर्वात अनुभवी आहे आणि ती पूजा वस्त्रकर आणि मेघनाला मदत करत आहे. मला वाटते की मेघना आणि पूजा यांच्यासारखे काही दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. आमच्याकडे शिखा पांडेही आहे. आमच्याकडे आता एक चांगला वेगवान गोलंदाजी विभाग आहे.’
मिताली पुढे म्हणाली, ‘निश्चितपणे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी आमच्या दोन कसोटी होत्या. आम्ही इंग्लंडमध्ये एक खेळलो आणि आता आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहोत. जर द्विपक्षीय मालिकांमध्ये हे नियमित घडत गेले तर महिला क्रिकेट अजून वाढेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने २००७ सालची आठवण काढत आगमी टी२० विश्वचषकासाठी फुंकले रणशिंग, वाचा काय म्हणाला