क्रिकेटचा वारसा असलेली काही कुटुंब आजही क्रिकेटजगतात पाहायला मिळतात. त्यांच्या अनेक पिढ्यांमधील सदस्यांनी क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवलेली पाहायला मिळते. भारतातील पंजाब राज्यातील जलांधरमध्ये सुद्धा एक कुटुंब आहे, जे पूर्णतः क्रिकेटशीच जोडलेले आहे. घरातील वातावरण देखील हे क्रिकेटचे आहे. घरात आजोबा, नातू, पुतण्या असे अनेकजण क्रिकेटपटू आहेत आणि सर्वजण रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत.
याच कुटुंबातील हरनुर ज्याने यूएई मध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आशिया चषकामध्ये आपल्या फलंदाजीने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. त्यांच्या अंगात क्रिकेटचे रक्तच वाहत आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण त्याचे वडील वीर इंदर सिंग, आजोबा सरदार राजिंदर सिंग, जे रणजी खेळले आहेत, ते चांगले प्रशिक्षकही आहेत.
हरनुरच्या घरात त्याचे काका हरमिंदर सिंग पण बीसीसआयमध्ये लेव्हल-2 प्रशिक्षक आहेत, तर त्याचे दुसरे काका जयाविर सिंग हे देखील रणजी खेळाडू आहेत. आजोबा सरदार रजिंदर सिंग हे पंजाब क्रिकेट असोसिशनचे संयुक्त सचिव, तसेच पंजाबचे सर्वोत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षक होते आणि ते क्रिकेट निवड समितीचे सदस्यसुद्धा होते.
हरनुरचे वडील म्हणतात की, “घरातील वातावरण असे आहे की, जेव्हा मूल शुध्दीवर येते, तेव्हा त्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे नसते, तर क्रिकेट खेळायचे असते.”
पुढे ते म्हणाले की, “हरनुरने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे आजोबा प्रशिक्षक राजींदर सिंग त्याला क्रिकेटच्या कवायती आणि मूलभूत गोष्टी शिकवायचे. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो चांगला खेळू शकतो, असे वाटत असताना त्याने चंदीगड क्लबकडून खेळायला सुरुवात केली.”
अधिक वाचा – ऍशेस तर गमावली, आता लाज राखण्यासाठी होणाऱ्या सिडनी कसोटीसाठी अनुपलब्ध असेल इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज
हरनुरचे काका हरमींदर पण्णू यांनी त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, कारण ते लेव्हल-2 चे प्रशिक्षक असल्याने त्यांना क्रिकेट मधील नवीन अपडेट माहिती असतात आणि सराव कसा करायचा हे माहिती आहे. त्यामुळे हरनुरने 16 वर्षाखालील स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
विजय मर्चंट ट्रॉफिमध्ये हरनुरणे 400 पेक्षा जास्त अधिक धावा केल्या. त्यानंतर 19 वर्षांखालील संघात निवड झाली. विनू मांकड ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरूद्ध खेळताना त्याने नाबाद 110 धावा केल्या आणि चॅलेंजर ट्रॉफीमध्ये 400 हून अधिक धावांचा विक्रमही केला. हरनुरचे मोठे काका गुरप्रित सिंग हे देखील रणजी खेळाडू आहेत. गुरप्रितची दोन मुले मुश्ताक आली ट्रॉफीमध्ये खेळली आहेत.
व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत
प्रशिक्षक सरदार रजींदर सिंग आता 87 वर्षांचे आहेत. एवढ्या वयातही ते शिकवत आहेत. त्यांनी देशातील स्टार खेळाडू फिरकी गोलंदाज बिशनसिंह बेदीपासून ते विक्रम राठोर,अश्विनी मिन्ना यांसारख्या क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
फ्लॅशबॅक २०२१: क्रिकेट विश्वात वर्षभरात उफाळलेल्या ‘या’ ५ वादांची झाली सर्वाधिक चर्चा