आशिया चषक 2022चा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट तज्ञ हर्षा भोगले यांनी स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन भारतीय खेळाडूंसह त्याने चार पाकिस्तानी, तीन श्रीलंकेचे आणि दोन अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा समावेश केला आहे. हर्षाने विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार या दोन भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. कोहलीने यावर्षी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 276 धावा केल्या, तर भुवीने सर्वाधिक 11 विकेट घेतल्या आहेत.
आशिया चषक 2022मधील हर्षा भोगलेची प्लेइंग इलेव्हन:-
मोहम्मद रिझवान, रहमानउल्ला गुरबाज, विराट कोहली, नजीबुल्ला जद्रान, भानुका राजपक्षे, दासुन शनाका, शादाब खान, मोहम्मद नवाज, भुवनेश्वर कुमार, नसीम शाह, दिलशान मदुशंका.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडपुढे भारताची घसरगुंडी, 9 विकेट्सने सामना गमावत टी20 मालिकेची निराशाजनक सुरुवात
ASIA CUP: रिजवान खेचून घेणार कोहलीचा ‘नंबर 1’चा मुकूट! कराव्या लागतील फक्त ‘इतक्या’ धावा