इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम संपला आहे. मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटलचा 5 गडी राखून पराभव करत विक्रमी पाचव्या वेळी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रोहितच्या नेतृत्वात मुंबईला यंदा आपल्या जेतेपदाचा किताब जिंकण्यात पुन्हा यश आले. आयपीएलचा हा हंगाम संपल्यानंतर क्रिकेटमधील बरेच मोठे व माजी खेळाडू आयपीएल मधील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर आपला सर्वोत्कृष्ट संघ निवडत आहेत.
दरम्यान, दिग्गज क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही आयपीएल 2020 साठी आपला संघ निवडला असून त्यांच्या संघात बरीच मोठी नावे समाविष्ट केलेली नाहीत.
हर्षा भोगले यांनी केएल राहुल आणि शिखर धवनला सलामीवीर म्हणून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तिसर्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला पसंती दिली आहे, तर चौथ्या क्रमांकावर त्यांनी एबी डिविलियर्सला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तसेच
त्यांनी कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांना आपल्या संघात पाच आणि सहा क्रमांकावर स्थान दिले आहे.
गोलंदाजी फळीत हर्षा भोगले यांनी जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे, तर त्याच्या संघात राशिद खान आणि युजवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाज निवडले आहेत.
हर्षा भोगले यांनी मुंबई इंडियन्सच्या चार खेळाडूंचा या संघात समावेश केला आहे, तर त्याच्याकडे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. तर पर्पल कॅप जिंकणारा रबाडा, आणि विजयी संघाचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांचेही नाव या संघात नाही. तसेच बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचेही नाव या संघात नाही.
हर्षा भोगलेची आयपीएल 2020 टीम –
केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, राशिद खान
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची झाली कोरोना टेस्ट; पाहा काय आलेत खेळाडूंचे रिपोर्ट
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर