Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘चुका करतो आणि शिकतो’, पदार्पणाच्या सामन्यातच ‘सामनावीर’ ठरलेल्या हर्षल पटेलची प्रतिक्रिया

November 20, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि २-० अशी विजयी आघाडी घेतली. हर्षल पटेलने भारतासाठी या सामन्यातून त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि संघासाठी महत्वाची कामगिरी करत सामनावीर ठरला. त्याने टाकलेल्या चार षटकात २५ धावा दिल्या आणि डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

सामना संपल्यानंतर त्याला उत्कृष्ट पदार्पणाची अपेक्षा नव्हती, असे हर्षल म्हटला. तसेच कर्णधार रोहित शर्मानेही त्याचे कौतुक केले

विजयानंतर सामनावीर निवडले गेल्यावर हर्षल पटेल म्हणाला की, “एवढ्या चांगल्या पदार्पणाची अपेक्षा केली नव्हती. जेव्हा तुम्ही प्रोसेसमध्ये असता, तेव्हा फक्त यामध्ये रमून जाता. सुधारणा वेळेसोबत होत असते, खासकरून माझ्या सारख्या लोकांसोबत,  ज्यांच्याकडे जास्त गुणवत्ता नाही. मला माझा गेम स्वतः तयार करावा लागतो. मी चुका करतो आणि पुन्हा त्यातून शिकतो की, मी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे.”

“हा खूप चांगला प्रवास राहिला आणि मी यादरम्यान खूप काही शिकलो. मला वाटते तुम्हाला जास्त विविधतेची गरज नाहीय. तुम्हाला फक्त एवढे जाणून घ्यायची गरज आहे की, तुमच्यासाठी कोणती गोष्ट काम करते आणि तुम्हाला त्याच्यावरतीच विश्वास पाहिजे. मी या परिस्थितीत यॉर्कर किंवा स्लोअर चेंडू एवढ्या उत्तम प्रकारे टाकू शकत नाही. मी यॉर्कर चेंडूवर काम करू इच्छित आहे आणि त्याला माझ्या खेळात सामील करू इच्छिचो. मी स्वतःला अनेकदा गोष्टींमध्ये अडकवले आहे. हे माझ्यासाठी एक दुसरे फ्लॅटफॉर्म आहे, जेथे मी माझे प्रदर्शन आणि स्किल्सने स्वतःला सिद्ध करू शकतो. मी हेच करू इच्छितो आणि जे येत-जात असते त्याचा आनंद घेऊ इच्छितो,” असे हर्षल पुढे म्हणाला.

कर्णधार रोहित त्याचे कौतुक करताना म्हणाला की, “हर्षल पटेलने अनेकदा असे केले आहे, तो अनेक वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्याला माहीत आहे की, त्याला काय करायचे आहे.”

दरम्यान, सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांच्या महत्वाच्या खेळीच्या जोरावर संघाला १७.२ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

रो-हिटचा जलवा! न्यूझीलंडविरुद्ध झळकवले विक्रमी अर्धशतक

जिद्दीला मेहनतीची साथ! एकेकाळी मैदानावर कापत होता गवत, आता आहे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फिरकी अस्त्र

लॉर्ड्सवरील शतक आणि सुपर मॅक्स इनिंग; सचिनच्या विस्मरणात गेलेल्या तीन अद्भुत खेळ्या


Next Post
Photo Courtesy: Twitter/@BCCI

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहितकडून युवा खेळाडूंचे कौतुक; म्हणाला, 'हा एक युवा संघ आहे आणि...'

Photo Courtesy: Twitter/BCCI

रोहितचा 'हिट' विक्रम! गेल, आफ्रिदीनंतर 'असा' कारनामा करणारा ठरला तिसराच क्रिकेटपटू

Photo Courtesy: Twitter/@BAI_Media

इंडोनेशिया मास्टर्स २०२१ स्पर्धेत पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक; एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143