सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून धुव्वा उडवला, तर दुसरा सामना पुण्याच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 113 धावांनी शानदार विजय मिळवत मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी एक बातमी समोर आली आहे की, तिसऱ्या सामन्यासाठी हर्षित राणाची (Harshit Rana) भारतीय संघात निवड झाली आहे.
भारतीय नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंड मालिकेसाठी निवडलेल्या राखीव संघात हर्षित राणाची (Harshit Rana) देखील निवड केली होती परंतु, दिल्ली क्रिकेटच्या विनंतीवरून या खेळाडूला रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024-25)च्या तिसऱ्या फेरीसाठी सोडण्यात आले. हर्षितनेही चमकदार कामगिरी करत डावात 5 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर फलंदाजीत जबरदस्त अर्धशतक झळकावले.
HARSHIT RANA IN INDIAN TEAM…!!!!! 🇮🇳
– Harshit Rana has been included in the Indian team for the third Test. [Pratyush Raj From Express Sports] pic.twitter.com/YsxJWzOjyz
— Johns. (@CricCrazyJohns) October 29, 2024
या कामगिरीनंतर तो पर्थ कसोटीत पदार्पण करू शकतो अशी अटकळ बांधली जात होती, पण आता मुंबई कसोटीतून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात होऊ शकते असे दिसत आहे. अरुण जेटली स्टेडियमवर वरिष्ठ निवडकर्ता अजय रात्रा उपस्थित होते, जिथे राणा दिल्ली विरुद्ध आसाम सामन्यात खेळत होता. दिल्लीने 10 गडी राखून मिळवलेल्या शानदार विजयात राणाने महत्त्वाची भूमिका बजावली.
हर्षित राणा (Harshit Rana) अनेक दिवसांपासून भारतीय संघाशी जोडला गेला आहे, परंतु त्याला अद्याप पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. हर्षितला यापूर्वी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघात सामील होण्याची संधी मिळाली होती आणि आता लाल चेंडूच्या संघातही त्याची एंट्री झाली आहे. आता मुंबई कसोटीत संधी मिळाल्यावर राणाने चमकदार कामगिरी केली, तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध पर्थ येथे होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पुनरागमन करताच वॉशिंग्टन सुंदरची किंमत वाढली, हे तिन्ही संघ करोडोंचा खर्च करायला तयार!
IND vs NZ; मुंबईत रवींद्र जडेजा इतिहास रचणार, या दिग्गज खेळाडूंना मागे सोडणार
IND VS NZ; मुंबईत 12 वर्षांपासून भारत अजिंक्य, वानखेडेवर वानखेडेवर बलाढ्य कामगिरी!