भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा दारूण पराभव केला. आता दोन्ही संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना (1 ते 5 नोव्हेंबर) दरम्यान मुंबईच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी युवा प्रतिभावान गोलंदाज हर्षित राणाची (Harshit Rana) भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
या मालिकेसाठी हर्षित राणा (Harshit Rana) राखीव यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंपैकी एक होता. बेंगळुरू कसोटीतही तो संघासोबत उपस्थित होता. पण त्यानंतर रणजी ट्रॉफीतील आसाम आणि दिल्ली संघातील सामन्यासाठी त्याला सोडण्यात आले. हर्षितने आसामविरूद्ध चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे तो आता संघाचा भाग बनला आहे. तत्पूर्वी आपण या बातमीद्वारे हर्षितला कोणत्या 3 खेळाडूंच्या जागी भारतीय संघात सामील केले जाऊ शकते हे जाणून घेऊया.
रवींद्र जडेजा- डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा भारतीय संघातील सर्वात प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे, पण न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत त्याने आपली लय गमावली आहे. गोलंदाजी करताना जडेजाने 6 विकेट्स घेतल्या आहेत, तर फलंदाजी करताना 85 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन तिसऱ्या कसोटीत जडेजाला वगळू शकते आणि त्याच्या जागी हर्षितला संधी देऊ शकते.
आकाश दीप- दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपचा (Akash Deep) संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, तो चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला नाही. पुणे कसोटीत आकाशला एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत हर्षित राणा त्याची जागा घेऊ शकतो.
रविचंद्रन अश्विन- या यादीत अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नावाचाही समावेश आहे. अश्विनच्या फिरकीची जादू न्यूझीलंडच्या फलंदाजांविरूद्ध कामी आली नाही आणि फलंदाजीने संघासाठी योगदान देण्यातही तो अपयशी ठरला. अश्विनने 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीत अश्विनच्या जागी हर्षितला संघात संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…
आरसीबीच्या ‘या’ स्टार खेळाडूने रणजी ट्राॅफीत 68 चेंडूत झळकावले शानदार शतक!