दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाने काल(8 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.
15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अमलाने 349 सामने खेळले असून 18000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात त्याच्या 55 शतकांचा आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे.
अमलाने 2004 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत 124 कसोटी सामने खेळताना 9282 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने कसोटीत केलेल्या या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत.
तसेच त्याने वनडेमध्ये 181 सामन्यात 8113 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये सर्वात जलद 2000,3000,4000,5000,6000 आणि 7000 धावा करण्याचा विक्रमही अमलाच्या नावावर आहे. त्याचबरोबर अमलाने टी20 क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करताना 44 सामन्यात 1277 धावा केल्या आहेत.
In an international career that was spread over 15 years he played 349 matches across the three formats for the Standard Bank Proteas, making more than 18 000 runs, including 55 centuries and 88 other scores in excess of 50. #ThankYouHash pic.twitter.com/RmUC1bKA6K
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 8, 2019
त्याचबरोबर जगभरात होत असलेल्या विविध टी20 लीग स्पर्धेतही तो खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे, कॅरिबियन प्रीमीयर लीगमध्ये बार्बाडोस त्रिडेन्ट्स आणि मझांसी सुपर लीगमध्ये डरहम हीटचे प्रतिनिधित्व केले आहे.
तसेच त्याला 2010 आणि 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.
अमलाने निवृत्ती घेताना त्याच्या पालकांचे, मित्रांचे, संघहकाऱ्यांचे, सपोर्ट स्टाफचे आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.
🔝 The most ODI hundreds by a South African
💯💯💯 The only Test triple hundred by a South African
🔟 One of 10 players to top the @MRFWorldwide Test & ODI Batting Rankings simultaneously
⚡ The fastest to 2000, 3000, 4000, 5000, 6000, and 7000 ODI runsThank you, @amlahash 👏 pic.twitter.com/JrkZWbp1PU
— ICC (@ICC) August 8, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का!
–रोहितने अतिशय कष्टाने केलेला तो विक्रम आज धोक्यात
–‘चायनामन’ कुलदीप यादवला शमी, बुमराहचा हा खास विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी