fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हसीन जहाँने डांन्स करत दिल्या ईदच्या शुभेच्छा, तर मोहम्मद शमी केला खास ट्विट

Hasin Jahan Funny Dance Mohammed Shami Eid Mubarak

नवी दिल्ली । भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ जेव्हा त्याच्यापासून दूर झाली, तेव्हापासूनच चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हसीन जेव्हा सोशल मीडियावर कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते, तेव्हा चाहते तिला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. सोमवारी (२५ मे) ईदच्या दिवशीदेखील असेच काही घडले. काही लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हसीन जहाँने ईदच्या दिवशी केला डांस-

हसीनने आपल्या अंदाजात चाहत्यांना ईदच्या (Eid) शुभेच्छा दिल्या. तिने ‘मेरी गोरी-गोरी बाहें, बाहों मे आ जाना, अब कैसा घबराना है और कैसा शर्माना…’ या गाण्यावर डांस केला. या व्हिडिओमध्ये तिच्या तोंडावर कार्टून कॅरेक्टरही लावलेले होते. तिचा हा व्हिडिओ अनेक लोकांना आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल केले. तिच्या व्हिडिओवर काही चाहत्यांनी लिहिले की, “वेडी बाई जरा तरी लाज बाळग.” तर दुसऱ्या चाहत्याने थेट तिच्या डांसवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच हसीनला चंद्राच्या रात्रीसुद्धा काही लोकांनी ट्रोल केले. हसीनने ईदपूर्वी चंद्राच्या रात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर एका चाहत्याने लिहिले की, “तू रोजा (उपवास) ठेवतेस का की केवळ टिक-टॉक व्हिडिओच बनवतेस?”

रोजाच्या दरम्यान हसीनने (Hasin Jahan) आपले काही व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यावर काही लोकांनी तिच्याविरुद्ध वाईट कमेंट्स केल्या होत्या. परंतु हसीनने आपल्या अंदाजात त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

शमीने अशाप्रकारे दिल्या ईदच्या शुभेच्छा-

हसीनने तर डांस करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तिचा पती शमीनेही (Mohammed Shami) आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

शमीने आपला एक फोटो शेअर करत लिहिले की, “ईद मुबारक, अल्लाह तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-फाफ डू प्लेसिसनंतर आता ‘हा’ खेळाडू करणार दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे नेतृत्व..?

-विराट कोहलीचा ‘हा’ शॉट जगातील सर्वोत्तम

-किंग्ज ११ पंजाब सोडून दिल्ली संघात जाण्याचे कारण अखेर अश्विनने सांगितलेच

You might also like