पुणे (7 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज तिसऱ्या दिवशी अहमदनगर संघाने सलग तिसरा विजय मिळवत हट्रिक केली. तर जालना संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई शहर ने धुळे संघावर मात देत तर रत्नागिरी संघाने रायगड संघाला पराभूत करत दुसरा विजय मिळवला.
पहिल्या सामन्यात नांदेड संघाने 46-17 असा जालना संघाचा धुव्वा उडवला. याकुब पठाणच्या सुपर टेन व निसार पठाणच्या हाय फाय ने नांदेड संघाने दुसरा विजय संपादन केला. तर अहमदनगर संघाने बीड संघावर एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेत विजयाची हट्रिक साधली. अहमदनगरच्या प्रफुल झवारे ने सलग दुसरा सुपर टेन पूर्ण केला. प्रसाद गोरे, सौरव मेद, संभाजी वाबले या बचावपटूंनी उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवला.
आजच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई शहर ने 45-26 असा धुळे संघावर विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थान वर झेप घेतली. जतिन विंदे च्या सुपर टेन व रुपेश साळुंखेच्या हाय फाय ने मुंबई शहर चा विजय सुकर केला. चौथ्या सामन्यात रत्नागिरी संघाने रायगड संघावर मात देत दुसरा विजय संपादन केला. विजयासह रत्नागिरी संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकवर पोहचला. (Hat-trick of victory Ahmednagar team tops the points table.)
संक्षिप्त निकाल-
नांदेड जिल्हा 46 – जालना जिल्हा 17
अहमदनगर जिल्हा 44 – बीड जिल्हा 20
मुंबई शहर 45 – धुळे जिल्हा 26
रत्नागिरी जिल्हा 36 – रायगड जिल्हा 31
महत्वाच्या बातम्या –
धरमशाला कसोटीत टीम इंडिया ऑलआऊट, भारताकडे 259 धावांची मोठी आघाडी
महाविक्रम! अँडरसन बनला 700 कसोटी विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज, लवकरच शेन वॉर्नला टाकणार मागे