इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम आता केवळ ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होईल. मात्र या हंगामाआधीच ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडने या हंगामातून माघार घेतली आहे. मात्र, त्याच्या माघार घेण्यामुळे भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा ट्रोल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाला पाहता ३० वर्षीय हेजलवुडने यंदाच्या आयपीएल हंगाम कालावधीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर यंदा चेन्नई सुपर किंग्सचा भाग झालेल्या चेतेश्वरला चाहते ट्रोल करत आहेत.
कारण नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराला गोलंदाजी करताना हेजलवूडला संघर्ष करावा लागला होता आणि त्यानंतर आता पुजारा आणि हेजलवूड चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र खेळताना दिसणार होते. मात्र आता हेजलवूडने माघार घेतल्याने ते एकत्र खेळताना दिसणार नाही.
पुजारा होतोय ट्रोल
हेजलवूडने माघार घेतल्यानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. एका चाहत्याने हेजलवूड आणि पुजाराला ट्रोल करताना एक मीम शेअर केले आहे, ज्यात पुजाराला हेजलवूडने माघार घेण्यामागील कारण असल्याचे म्हटले आहे. तर एका चाहत्याने म्हटले आहे की हेजलवूडने माघार घेतली कारण त्याला पुजाराला नेट्समध्ये गोलंदाजी करायची नव्हती.
विशेष म्हणजे चेन्नईनेही पुजाराचा एक फोटो शेअर करत मजेदार ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘चेपु जोश, काय झाले?’
ChePu Josh, what happened? 🤔😉 #WhistlePodu #Yellove 💛🦁 pic.twitter.com/gOBR7PPfRW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2021
https://twitter.com/rohitrajoffici5/status/1377471569753206784
Josh Hazzlewood leaving CSK before #IPL2021
Public to #Pujara :- pic.twitter.com/Drqe4sYvwW— The Witty Man (@thewittyman1710) April 1, 2021
Josh Hazlewood has opted out of IPL 2021. becoz he have to Bowl against Pujara at nets 😂 @ChennaiIPL #AprilFoolsDay #CheteshwarPujara pic.twitter.com/pyyEicrWdc
— Rituu A Rathi – ( Modi Ka Parivar ) (@RituuARathi) April 1, 2021
Josh Hazlewood when he heard he had to bowl to Pujara in IPL 2021 pic.twitter.com/IiWlWEjg8n
— Farhan Khan فرحان خان (@Farhankhan_786_) April 1, 2021
Josh Hazlewood when he heard he had to bowl to Pujara in IPL 2021 pic.twitter.com/dE5QvAYtKT
— 𝐉.𝐈.𝐓.🚩 😷 (@JitRo45) April 1, 2021
https://twitter.com/Bibhu237/status/1377424263825694724
Cheteshwar Pujara throwing Josh Hazlewood out of the IPL 2021 pic.twitter.com/1ZJxWtnZI4
— aman (@bilateral_bully) April 1, 2021
सात वर्षानंतर पुजारा आयपीएलमध्ये
पुजाराला यंदाच्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने ५० लाखांची बोली लावत संघात घेतले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आयपीएल लिलावात सहभाग घेत असलेल्या चेतेश्वर पुजाराला ७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याने २०१४ साली शेवटची आयपीएल स्पर्धा खेळली होती. या स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करण्यास अपयश आले. तो आतापर्यंत केकेआर, आरसीबी आणि किंग्स इलेवन पंजाब संघासाठी आयपीएल खेळला आहे.
पुजाराने सुरु केला सराव
पुजारा चेन्नई संघात काही दिवसांपूर्वीच सामील झाला असून त्याने संघासह सरावालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, तो काही मोठे फटके मारतानाही दिसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आयपीएलमध्ये तर अनुष्का शूटींगमध्ये व्यस्त; पाहा मग कोण करतंय चिमुकल्या वामिकाचा सांभाळ?
विराट कोहली अडकला धर्मसंकटात!! ‘या’ दोन खेळाडूंपैकी कोणाला देणार संघात स्थान
सोन्यासारखी संधी! विराट, शिखरसह ‘हे’ खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामात करु शकतात मोठे विश्वविक्रम