fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा बाद झाल्यावर धोनीने थेट बॅट फेकून देत केले होते हे कृत्य

May 14, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

जगभरातील लोक भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला ‘कॅप्टन कूल’ या नावाने ओळखतात. परंतु त्याच्याबरोबर खेळणाऱ्या माजी क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की, धोनीसुद्धा एक माणूस आहे. तोदेखील काही वेळा मैदानावर रागावलेला आहे. १४ वर्षांपूर्वी तर त्याला इतका राग आला होता की, तो बॅट फेकून थेट ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला होता.

याबरोबरच २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यादरम्यान धोनीचे (MS Dhoni) चायनामन गोलंदाज कुलदीप यादववर (Kuldeep Yadav) रागावणेदेखील चर्चेचा विषय ठरला होता.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलमध्येही चाहत्यांनी काही वेळा धोनीला रागावताना पाहिले आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी सांगितले की, धोनी काही वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान रागावताना दिसला होता.

स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात इरफानने २००६-०७च्या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, “आम्ही सरावादरम्यान एक सामना खेळला होता. ज्यामध्ये उजव्या हाताच्या फलदाजांना डाव्या हाताने आणि डाव्या हाताच्या फलंदाजांना उजव्या हाताने फलंदाजी करायची होती. यानंतर आम्हाला नेटमध्ये सराव करायचा होता. सरावादरम्यान आम्ही २ संघ तयार केले होते.”

“धोनीला बाद घोषित करण्यात आले पण तो बाद झाला नव्हता. त्यावेळी त्याने रागात येऊन आपली बॅट फेकली आणि ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला. तसेच सरावासाठीही उशिरा आला होता. त्यामुळे राग त्यालाही येतो,” असेही तो यावेळी म्हणाला.

याव्यतिरिक्त गंभीरने म्हटले की, “लोक म्हणतात की, त्यांनी धोनीला रागावताना पाहिले नाही. परंतु मी २ वेळा पाहिले आहे. ही २००७ आणि आणखी एका विश्वचषकादरम्यानची घटना आहे. त्यावेळी आम्ही चांगली कामगिरी केली नव्हती.”

गंभीर पुढे म्हणाला की, “तोदेखील एक माणूस आहे. त्याचे प्रत्युत्तर देणे स्वाभाविक आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना जेव्हा कोणीही क्षेत्ररक्षण चांगल्याप्रकारे न केल्याने किंवा झेल सोडल्यावर त्याने प्रतिक्रिया देणे योग्य आहे. हो, तो शांत व्यक्ती आहे. तो इतर कर्णधारांच्या तुलनेत खूपच शांत आहे. निश्चितच तो माझ्या तुलनेत खूप शांत आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-मुंबई इंडियन्समधून लसिथ मलिंगा बाहेर, रोहितलाही वाटले वाईट

-म्हणून तब्बल १ वर्ष सचिन समोर जेवण करत नव्हता हा भारतीय क्रिकेटपटू

-आता जर टीम इंडिया मागे हटली तर कसोटी क्रिकेट संपून जाईल


Previous Post

डाॅक्टरांनी सांगितलं होतं चालणंही आहे कठीण, पुढे २०वर्ष कष्ट करुन झाली खेलरत्न

Next Post

एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू

२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क ५व्या स्थानावर

तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.