---Advertisement---

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या इतिहासात किती वेळा भिडले भारत-पाकिस्तान? कोणी गाजवले वर्चस्व?

---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात उद्यापासून (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी एकूण 8 देश पात्र ठरले आहेत, ज्यांना प्रत्येकी 4 संघांच्या 2 गटात विभागण्यात आले आहे. ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.

दरम्यान जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी (23 फेब्रुवारी) या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतील, कारण या दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमने-सामने असणार आहेत. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास काय आहे? कोणत्या संघाने किती वेळा बाजी मारली याबद्दल आपण जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 1998 मध्ये सुरू झाली. त्यानंतर, या स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान एकूण 5 वेळा आमने-सामने आले आहेत. या 5 सामन्यांमध्ये पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे आणि भारतीय संघ 2 वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचा पहिला सामना 2004 मध्ये झाला होता, जिथे पाकिस्तानी संघाने 3 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर, 2009 मध्ये, पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाने विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवर पहिला विजय 2013 मध्ये झाला होता, जेव्हा त्यांनी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा 8 गडी राखून धुव्वा उडवला होता.

2017 मध्ये दोन्ही संघ दोनदा भिडले होते. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 124 धावांनी धुव्वा उडवला होता. पण जेव्हा ते पुन्हा फायनल सामन्यात भिडले, त्यावेळी पाकिस्तानचे वर्चस्व राहिले. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आणि चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले.

2004 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तानने 3 विकेट्सने विजय मिळवला.
2009 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तानने 54 धावांनी विजय मिळवला.
2013 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारताने 124 धावांनी विजय मिळवला.
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी (फायनल सामना) – पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये 3 अष्टपैलू खेळाडू घालणार धूमाकूळ! भारतासाठी हार्दिक पांड्या ठरणार ट्रम्प कार्ड?
भारतीय खेळाडूंसाठी खुशखबर! BCCI कडून मोठी घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास: कशी झाली सुरुवात आणि का खेळतात फक्त आठ संघ?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---