काही दिवसांपूर्वी असे म्हटले जात होते की कोरोना व्हायरसनंतर जेव्हा खेळ सुरु होतील, तेव्हा खूप काही बदल केले जातील. खेळांच्या नियमांमध्ये खेळाडूंच्या वागणूकीत बदल पहायला मिळू शकतो. या व्हायरसचा फटका त्या खेळाडूंनाही बसू शकतो, ज्यांची इम्यूनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे.
या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा खेळाडू जॅक लीचचाही (Jack Leach) समावेश आहे. ज्याने मागील वर्षी ऍशेस मालिकेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केली होती. मागील वर्षी इंग्लंडला हेडिंग्ले (Headingley) येथे रोमांचक विजय मिळवून देण्यात जॅकने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेडिंग्ले कसोटी सामन्यात जॅकने बेन स्टोक्सबरोबर शेवटच्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली होती. तसेच विशेष म्हणजे त्याने या सामन्यात केवळ १ धाव केली होती. असे असले तरी त्याच्या त्या भागीदारीमुळे इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. तरीही पुढील वर्षी त्याची इंग्लंड संघाकडून खेळण्याची शक्यता कमी आहे.
खरंतर जॅकला लहानपणी क्रोहन्स नावाचा आजार झाला होता. ज्यामुळे तो दीर्घ काळापासून औषधे घेत आहे. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. यामुळेच त्याला कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण होण्याचा धोका खूप जास्त आहे.
इंग्लंड क्रिकेट संघ यावर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळू शकतो. परंतु त्यांना सरकारच्या नियमांचे पालन करावे लागेल. इंग्लंड सरकारच्या मते, ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे आणि ज्यांना या व्हायरसची लागण सहजपणे होऊ शकते, ते जून महिन्याच्या शेवटीपर्यंत घरातून बाहेर निघू शकत नाहीत. तरीही आता हे स्पष्ट नाही की जॅकचा या यादीत समावेश आहे की नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (England and Wales Cricket Board) अधिकाऱ्यांमध्ये कोविड-१९ या व्हायरसदरम्यान दौरा सुरु ठेवण्याबाबत १८ मेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहित, कोहलीमुळे बीसीसीआय वैतागली, मोहम्मद शमीचं मात्र नाही काहीच टेन्शन
-पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज