fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

….आणि एवढा महान क्रिकेटर श्रीनाथ सचिनची पँट घालूनच उतरला मैदानात

August 31, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


भारतीय क्रिकेट संघातील अनेक गमतीजमतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात. कोणाचा वाढदिवस, कोणाची चेष्टामस्करी, नवीनच “चहल टीव्ही” अशा अनेक गोष्टी सतत क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळत असतात पण सोशल मीडियाच्या जमान्याआधीदेखील भारतीय संघात खूप मजेदार किस्से घडत. अशाच एका किस्स्याची पोलखोल भारताचा माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी (Hemang Badani) यांने केली आहे.

हेमांग बदानी याने अठरा वर्षापूर्वीचा जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा इंस्टाग्रामवर सांगितला.

“२००२ ला इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कटक येथील सामन्यापूर्वी श्रीनाथ खूप निराश होता. त्याची निराशा घालवण्यासाठी सचिन तेंडुलकरने मोठी मजा केली. त्याचा पत्ता श्रीनाथला मैदानावर गेल्यावर लागला.

त्यादिवशी श्रीनाथ खूपच नर्व्हस दिसत होता. ही गोष्ट सचिनच्या लक्षात आली. मी तो सामना खेळणार नसल्याने सचिन माझ्याकडे आला आणि आम्ही श्रीनाथची मजा घेण्याचे ठरवले.”

सचिनने सांगितल्याप्रमाणे, मी सचिनची ट्राउझर (पँट) श्रीनाथच्या किटबॅगमध्ये ठेवली आणि श्रीनाथचा ट्राउझर (पँट) दुसरीकडे लपविली. आम्ही आता पुढे काय होते याची वाट पाहत होतो कारण, श्रीनाथची उंची सहा फूट दोन इंच तर सचिनची उंची पाच फूट पाच इंच होती.

थोड्यावेळाने श्रीनाथ वॉर्म अप करून आल्यावर त्याने आपली किट बॅग उघडून त्यातील तो सचिनचा ट्राऊजर घातली. त्याने अजिबात नोटीस केले नाही की आपण छोटा ट्राउझर (पँट) घातली आहे. टीम मीटिंग झाल्यावर श्रीनाथ तसाच मैदानावर गेला आणि त्याने पहिले षटक टाकले देखील.. सगळे खेळाडू त्याच्यावर हसत होते तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण छोटा ट्राऊजर घालून आलोय आणि त्यानंतर स्वतः देखील हसत ड्रेसिंग रूममध्ये येऊन त्याने स्वतःचा ट्राउझर (पँट) घातली.”

तमिळनाडूसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या हेमांग बदानी याने २००० ते २००४ या काळात भारतासाठी ४० एकदिवसीय सामने खेळले तर कसोटी कारकीर्द फक्त चार सामन्यांची राहिली. सध्या तो समालोचक म्हणून काम करतो.


Previous Post

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

Next Post

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Photo Courtesy: Twitter/ FIDE_chess

चेस ऑलिंपियाड: भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला इतिहास; पहिल्यांदा पटकावले सुवर्णपदक

Photo Courtesy: Twitter/bhogleharsha

हर्षा भोगलेंनी शेअर केला खास जूना फोटो; पहा ओळखू येतात का तूम्हाला त्यातील क्रिकेटर्स

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.