आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 70 धावांच्या फरकांनी विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. या सामन्यादरम्यान आयर्लंडकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सिमी सिंगने वनडे क्रिकेटमध्ये मोठा विक्रम नोंदविला आहे.
सिमी सिंगने या डावात नाबाद 100 धावा केल्या होत्या. या शतकी खेळीमुळे सिमी सिंग आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकवणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याचाच संदर्भ घेत आम्ही येथे वनडे क्रिकेटम्ध्ये फलंदाजीच्या 1 ते 11 या प्रत्येक क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांचा आढावा घेतला आहे.
या 11 खेळाडूंच्या यादीमध्ये 2 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर पहिल्या स्थानावर न्यूझीलंड संघाचा फलंदाज मार्टिन गुप्टीलचे नाव आहे. मार्टिन गुप्टिलने सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरत वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या नाबाद 237 धावा करण्याचा विक्रम केला होता. यासह तो वनडेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे नाव दुसर्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने श्रीलंका संघाविरुद्ध नाबाद 264 धावा केल्या होत्या.
तर तिसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वे संघाचा चार्ल्स कॉव्हेंट्री यांनी नाबाद 194 धावा केल्या होत्या. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे विव रिचर्ड्स आणि एबी डिव्हिलियर्स हे दोन खेळाडू आहेत. सहाव्या क्रमांकावर भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांचे नाव या यादीत आहे. कपिल देव यांनी झिम्बाब्वे संघाविरुद्ध नाबाद 175 धावा केल्या होत्या. तर सातव्या क्रमांकावर लुक रोन्ची आहेत. नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आंद्रे रसल आणि रवी रामपॉल हे खेळाडू आहेत आणि अकराव्या स्थानावर पाकिस्तान संघाचा मोहम्मद अमिर आहे.
वनडेमध्ये प्रत्येक क्रमांकावर सर्वोच्च खेळी करणारे क्रिकेटपटू
1 – मार्टिन गुप्टिल – 237*
2 – रोहित शर्मा- 264*
3 – चार्ल्स कॉव्हेंट्री – 194*
4 – विव रिचर्ड्स – 189*
5 – एबी डिव्हिलियर्स – 162*
6 – कपिल देव – 175*
7 – लुक रोन्ची – 170*
8 – सिमी सिंग – 100*
9 – आंद्रे रसेल – 92
10 – रवी रामपॉल – 86*
11 – मोहम्मद अमीर – 58
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा ‘द वॉल’ची बॅट घेऊन स्म्रीती उतरली होती मैदानात, झळकावले होते झंझावती द्विशतक
श्रीलंकेविरुद्ध ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार द्विशतक! ५ महिन्यांआधीच केली होती अद्वितीय कामगिरी
श्रीलंका वि. भारत: युझवेंद्र चहलकडे विकेट्सचा ‘शतकवी’र बनण्याची संधी, ‘या’ दिग्गजांवर ठरेल वरचढ