ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा आणि शेवटचा वनडे सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भारतीय महिला क्रिकेट संघ आता गुरुवारपासून (३० सप्टेंबर) सुरू होणाऱ्या यजमानांविरुद्धच्या पहिल्या डे-नाईट कसोटीतही हीच विजयी लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
भारताचा पहिला डे-नाईट कसोटी सामना
तिसऱ्या वनडे सामन्यानंतर रविवारी आणि सोमवारी भारतीय महिला संघाने विश्रांती घेतली. त्यामुळे मिताली राजच्या संघाला या कसोटीच्या तयारीसाठी फक्त दोन सत्रे मिळाली. वनडे मालिकेत भारताला २-१ ने पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय महिला संघ पहिल्यांदा गुलाबी चेंडूने खेळत आहे, त्यामुळे चमकदार गुलाबी चेंडूचा काय परिणाम होईल याची खेळाडूंना कल्पना नाही.
ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर २०१७ मध्ये एकमेव डे-नाईट कसोटी खेळली होती. त्यांनाही फारसा सराव करता आला नाही. मात्र, त्यांचे वेगवान गोलंदाज मेट्रिकॉन स्टेडियमच्या हिरव्या खेळपट्टीवर कहर करू शकतात.
ही भारताची लिटमस टेस्ट
सात वर्षांनंतर पहिली कसोटी खेळताना भारताने जूनमध्ये इंग्लंडला बरोबरीत रोखले होते. खेळाडू आणि तज्ञांचा मात्र असा विश्वास आहे की, गुलाबी चेंडूचे आव्हान कठीण असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया शेवटची कसोटी २००६ मध्ये खेळली होते. मिताली राज आणि झुलन गोस्वामी या केवळ दोनच अशा खेळाडू आहेत, ज्यांनी ही कसोटी खेळली आहे.
भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी म्हणाल्या, “मी याला भारतीय संघाची लिटमस टेस्ट म्हणेल. खेळाडू गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये लाल चेंडूने कमी खेळले आहेत. डे-नाईट कसोटी पूर्णपणे वेगळी आहे आणि आव्हान खूप कठीण आहे. ऑस्ट्रेलियाला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक अनुभव आहे. परंतु, त्यांचे खेळाडू देखील अलीकडे बरेच सामने खेळले नाहीत. भारताने वनडे मालिकेत दाखवून दिले आहे की ऑस्ट्रेलियाला पराभूत करता येते.”
डे-नाईट कसोटीसाठी भारताचा संघ-
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया, शिखा पांडे, झूलन गोस्वामी, मेघना सिंह, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव व रिचा घोष.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीतून प्रमुख खेळाडू बाहेर
रोहितने २००७ सालची आठवण काढत आगमी टी२० विश्वचषकासाठी फुंकले रणशिंग, वाचा काय म्हणाला