---Advertisement---

हॉकी महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष राज्य अंजिक्यापद २०२१: हॉकी पुणेने राखले विजेतेपद

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 12:59 AM
---Advertisement---

पुणे। हॉकी पुणे संघाने राज्य अजिंक्यपद टिकविताना आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गुरुवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात हॉकी कोल्हापूरचा एकतर्फी लढतीत ५-० असा पराभव केला. हा सामना पिंपरी – नेहरू नगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झाला.

अंतिम लढती वर पुणे संघाचे पूर्ण वर्चस्व होते. त्यांनी ३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. पुण्याच्या रोहन पाटील याने २ ऱ्या व ३६ व्या. ओंकार मुसळे याने ५९ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. पुण्याचे अन्य दोन गोल अथर्व कांबळे 14 व्या तर कर्णधार तालिब शहाने ३३ व्या मिनिटाला गोल केले. सामन्याच्या अखेरच्या सत्रात रोहन पाटील ने पेनल्टी स्ट्रोकची संधी दवडली.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उस्मानाबाद संघाने औरंगाबाद चा ४-३ असा एका गोलच्या फरकाने पराभव केला. विजयी संघाकडून झिशान शेख (८, १९,२५ वे) तीन गोल केले. संतोष कस्तुरेने एक गोल केला. पराभूत संघाकडून राज पवारने बरोबरी साधल्यावर सामना वेगवान झाला. मात्र त्यांना उस्मानाबादच्या खेळाचा प्रतिकार करता आला नाही. ओम चांगले आणि रोहित जाधव यांनी गोल करून पराभवाचा फरक कमी केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे, डॉ. धनराज पिल्ले, यांच्या उपस्थितीत पार पडले; यावेळी उत्तम केंदळे, अध्यक्ष, उपस्थित होते. क्रीडा समितीच्या सहायक आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे, जतीन देसाई, झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, पराग ओझा (खजिनदार, हॉकी महाराष्ट्र), जसिंता जाधव, उपाध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र, हितेश जैन, अध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र, मनीष आनंद, उपाध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र आणि अध्यक्षस्थानी हॉकी पुणे हे उपस्थित होते, तर हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनोज भोरे यांनी आभार मानले.

निकाल
अंतिम: हॉकी पुणे: ५ (रोहन पाटील २ रा, ३५ वे; अथर्व कांबळे १४ वे; रायब शहा ३३ वे ; ओंकार मुसळे ५९ वे) वी.वी. कोल्हापूर: ०. मध्यांतर: २-०

तिसरे स्थान: हॉकी उस्मानाबाद: ४ (झिशान शेख ८ वे, १९ वे, २५ वे; संतोष कस्तुरे २० वे) वी.वी. हॉकी असोसिएशन औरंगाबादः ३ (राज पवार १४ वे; ओम चांगले ४४ वे; अक्षय जाधव ४५वे). मध्यांतर: ४-१

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---