हॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत

औरंगाबाद । हॉकी ओडिशा आणि भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांनी साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिस्पर्धींना मात देत उपउपांत्यफेरी गाठली आहे. शनिवारी (23 फेब्रुवारी) झालेल्या लढतींमध्ये हॉकी ओडिशा आणि साई संघांनी यश मिळवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भारतीय खेळ प्राधिकरणच्या हॉकी मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत शनिवारी हॉकी ओडिशाने हॉकी बिहार संघाला 2-0 च्या फरकाने पराभुत करत ड गटात दहा गुणांसह अव्व्ल स्थान मिळवले. सुशील धनवर (31 मि.) ने पेनल्टी कॉर्नरची संधी घेतली आणि गोल कमावला. त्यानंतर सुशांत टोपोने 45 व्या मिनीटांत गोल करत निर्णायक 2-0 ची आघाडी स्थापन करुन ओडिशाला विजय मिळवुन दिला.

त्यानंतर “साई’ स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डला 4-2 च्या फरकाने नमवुन उपउपांत्य फेरीत जागा मिळवली. त्यांनी 9 गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले आणि आपले आव्हान कायम ठेवले. साईच्या मनिष यादवने 19 व्या मिनीटांत पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरीत केले. त्यापाठोपाठ मायकल टोप्नोने 28 व्या मिनीटांत गोल केला. साईच्याच रोहितने 30 व्या मिनीटात गोल करत पहिल्या सत्रात साईला 3-0 ने आघाडी मिळवुन दिली. दुसऱ्या सत्रात नबीन कूंजीर ने 37 आणि 47 व्या मिनीटांतच दोन गोल करुन सामन्यात रंग भरला. साईची आघाडी कापण्याच्या प्रयत्नात हा सामना स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डला 3-2 च्या गुणसंख्येपर्यंतच नेता आला. साईच्या रोहितने 3-2 ची आघाडी 50 व्या मिनीटांत गोल करुन निर्णायक आघाडी ही 4-2 वर नेली आणि सामना जिंकला.

निकाल:
गट ड : हॉकी ओडिशा : 2 (सुशील धनवर 31 मि, सुशांत टोप्पो 45 मि.) वि. वि. हॉकी बिहार : 0. हाफटाईम 0-0.

गट ड : भारतीय खेळ प्राधिकरण : 4 (मनिष यादव 19 मि, मयकल टोप्नो 28 मि, रोहित 30, 50 मि.) वि. वि. स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड : 2 (नबीन कूंजीर 37 मि, 47 मि.) हाफ टाईम : 3-0

उपउपांत्य फेरी :
गट अ : हॉकी चंडीगड आणि हॉकी पंजाब
गट ब : हॉकी हरियाणा आणि मध्यप्रदेश हॉकी संघटना
गट क : उत्तर प्रदेश हॉकी आणि हॉकी गंगपूर ओडिशा
गट ड : हॉकी ओडिशा आणि भारतीय खेळ प्राधिकरण

उपउपांत्य फेरीतील सामने
हॉकी चंडीगड वि. मध्यप्रदेश हॉकी संघटना
हॉकी ओडिशा वि. हॉकी गंगपूर ओडिशा
हॉकी हरियाणा वि. हॉकी पंजाब
उत्तर प्रदेश हॉकी वि. भारतीय खेळ प्राधिकरण (साई)

You might also like