---Advertisement---

हॉकी पुणे लीग : विक्रांत वॉरियर्सचा विक्रमी विजय, पूना हॉकी अकॅडमीची किड्स अकॅडमीवर 10-0 अशी मात

---Advertisement---

पुणे – विक्रांत वॉरियर्स हॉकी क्लबने हॉकी पुणे लीगच्या ज्युनियर डिव्हिजन ब गटात पुणे मॅजिशियन्सवर पिछाडीवरून 3-1 असा विजय मिळवला. हे तिन्ही गोल शेवटच्या 13 मिनिटांत झाले. अन्य लढतीत पूना हॉकी अकॅडमीने किड्स अकॅडमीला 10-0 अशा मोठ्या फरकाने हरवले.

नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर शनिवारी दुपारी उशिरा झालेल्या सामन्यात अयान पागेदारने 47व्या मिनिटाला पुणे मॅजिशियन्सचे खाते उघडले. त्यानंतर उर्वरित मिनिटांत तीन गोल करताना विक्रांत वॉरियर्सनी सर्वोत्तम विजयाची नोंद केली.

विक्रांत खर्गेने 53व्या आणि 57व्या मिनिटाला (पेनल्टी-कॉर्नर) गोल करताना विक्रांत वॉरियर्सना 2-1 असे आघाडीवर नेले. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना शुभन ढवळेने(58व्या) सर्वोत्तम गोल करताना टीमला 3-1 अशा विजयी आघाडीवर नेले.

अ गटातील सामन्यात पूना हॉकी अकॅडमीने किड्स हॉकी अकॅडमीवर 10-0 असा मोठा विजय नोंदविला. त्यातील पाच गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून आहेत.

आफताब सय्यद (11वा – पीसी, 32वा – पीसी), रौनक येडलेल्लू (15वा, 22वा – पीसी, 45वा – पीसी), अजिंक्य काळभोर (18वा), शाल्मन पाटोळे (28वा – पीसी), ब्रायन लेविस (39वा) तसेच सक्षम हुलेच्या (52वा, 54वा) सुरेख गोलांच्या जोरावर पूना हॉकी अकॅडमीने एकतर्फी विजय मिळवला.

हॉकी पुणे लीगमध्ये आता 30 जून ते 2 जुलै 2024 असा चार दिवसांचा ब्रेक असून 3 जुलैपासून पुन्हा सामने खेळवले जातील.

निकाल – कनिष्ठ विभाग:

अ गट: पूना हॉकी अकादमी: 10(आफताब सय्यद 11वा – पीसी., 32वा – पीसी; रौनक येडलेल्लू 15वा, 22वा – पीसी., 45वा – पीसी; अजिंक्य काळभोर 18वा; शाल्मोन पाटोळे 28वा – पीसी. ब्रायन लेविस 39वा; सक्षम हुले 52वा, 54वा; विजयी वि. किड्स हॉकी अकॅडमी:0 . हाफटाईम: 5-0.
ब गट: विक्रांत वॉरियर्स हॉकी क्लब: 3(विक्रांत खर्गे 53वा, 57वा – पीसी; शुभन ढवळे 58वा) विजयी वि. पुणे मॅजिशियन्स: 1(अयान पागेदार 47वा). हाफटाईम: 0-0

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---