fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत नमिश हुड, आरोही देशमुख, क्रिशय तावडे, श्रावी देवरे यांना विजेतेपद

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत नमिश हुड, आरोही देशमुख, क्रिशय तावडे व श्रावी देवरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

अक्षय शहाणे टेनिस अकादमी, भुगाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत दुस-या मानांकीत नमिश हुडने वेदांत खानवलकरचा 7-5 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अव्वल मानांकीत आरोही देशमुखने वंशिका अगरवालचा 7-4 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

8 वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या मानांकीत क्रिशय तावडेने निल बोंद्रेचा 7-3 असा तर मुलींच्या गटात दुस-या मानांकीत श्रावी देवरेने अव्वल मानांकीत श्रृष्टी सिर्यवंशीचा 7-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अक्षय शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरिक्षीक रेशम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
10 वर्षाखालील मुले:
उपांत्य फेरी:

वेदांत खानवलकर वि.वि सनत कडले 6-3
नमिश हुड (2) वि.वि शौनक रणपीसे 6-3;

अंतिम फेरी- नमिश हुड (2) वि.वि वेदांत खानवलकर 7-5;

10 वर्षाखालील मुली:
उपांत्य फेरी:

आरोही देशमुख(1) वि.वि काव्या तुपे(5)6-1;
वंशिका अगरवाल पुढेचाल.वि अस्मी टिळेकर(2)

अंतिम फेरी- आरोही देशमुख(1) वि.वि वंशिका अगरवाल 7-4;

8 वर्षाखालील मुले:
उपांत्य फेरी:

निल बोंद्रे वि.वि युग उपरीकर (4) 6-1;
क्रिशय तावडे(2) वि.वि स्मित उंद्रे(3) 6-3;

अंतिम फेरी- क्रिशय तावडे(2) वि.वि निल बोंद्रे 7-3;

8 वर्षाखालील मुली:
अंतिम फेरी:

श्रावी देवरे(2) वि.वि श्रृष्टी सिर्यवंशी(1) 7-3.

You might also like