रविवारी (14 जुलै) विम्बल्डन 2024 चा अंतिम सामना (Wimbledon 2024) खेळला गेला. या सामन्यात 21 वर्षीय कार्लोस अल्कारेजने (Carlos Alcaraz) शानदार कामगिरी करून इतिहास रचला. त्याने अंतिम सामन्यात सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2, 7-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. यानंतर दोन्ही खेळाडूंना मोठी बक्षिस रक्कम दिली गेली. विशेष म्हणजे एकट्या खेळाडूंसाठी असलेली ही रक्कम नुकत्याच भारतीय संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मिळालेल्या बक्षीसापेक्षा जास्त आहे.
आपले चौथे ग्रँडस्लॅम जिंकलेल्या अल्कारेज याला या विजयानंतर भारतीय रुपयात तब्बल 28 कोटी 35 लाख इतकी रक्कम मिळाली. तर उपविजेता ठरलेल्या जोकोविच याला 14 कोटी 70 लाख इतकी घसघशीत बक्षीस रक्कम दिली गेली. या रकमेची भारतीय संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक बक्षीस रकमेची तुलना केली असता, विश्वचषक जिंकलेल्या संघाला नगण्य बक्षीस मिळाल्याचे दिसून येते.
भारतीय संघाला विजयानंतर आयसीसीकडून 20 कोटी 42 लाख रुपये मिळाले होते. तर, उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला 10 कोटी 60 लाखांवर समाधान मानावे लागलेले. आयसीसीच्या माहितीनुसार, टी20 विश्वचषकात भारतीय रुपयात जवळपास 94 कोटी रुपयांचे वाटप झालेले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड व अफगाणिस्तान यांना देखील प्रत्येकी 6 कोटी 56 लाख इतके बक्षीस मिळालेले.
विम्बल्डनच्या पुरुष एकेरीतील इतर खेळाडूंना मिळालेल्या रकमेचा विचार केल्यास, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्यांना प्रत्येकी 7 कोटी 75 लाख रुपये देण्यात आलेले.
विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी बक्षिस रक्कमेचे वाटप
विजेता– 28 कोटी 35 लाख रुपये
उपविजेता– 14 कोटी 70 लाख रुपये
उपांत्य फेरी– 7 कोटी 75 हजार रुपये
उपांत्यपूर्व फेरी– 3 कोटी 93 लाख 75 हजार रुपये
चौथी फेरी: 2 कोटी 37 लाख 30 हजार रुपये
तिसरी फेरी: 1 कोटी 50 लाख 15 हजार रुपये
दुसरी फेरी : 97 लाख 65 हजार रुपये
पहिली फेरी: 63 लाख रुपये
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”