भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने ऋषिकेश यांना भारतीय महिला क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने असाही निर्णय घेतला आहे की, भारतीय महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत मिळून काम करतील.
काय म्हणाले कानिटकर?
बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात आपल्या नियुक्तीबद्दल ऋषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) यांनी मत मांडले. ते म्हणाले की, “वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचा नवीन फलंदाजी प्रशिक्षक निवडले जाणे सन्मानाची गोष्ट आहे. मला या संघात जबरदस्त शक्यता दिसत आहेत आणि आमच्याकडे युवा आणि अनुभव या दोघांचेही मिश्रण आहे. माझा असा विश्वास आहे की, हा संघ पुढील आव्हानासाठी तयार आहे. आमच्या समोर काही मोठ्या स्पर्धा येत आहेत आणि या संघासाठी तसेच फलंदाजी प्रशिक्षकाच्या रूपात माझ्यासाठी रोमांचक असणार आहे.”
🚨 NEWS 🚨: Hrishikesh Kanitkar appointed as Batting Coach – Team India (Senior Women), Ramesh Powar to join NCA
More Details 🔽https://t.co/u3Agagamdd
— BCCI (@BCCI) December 6, 2022
रमेश पोवार यांची प्रतिक्रिया
दुसरीकडे, रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी एनसीएमध्ये सामील होण्याबद्दल म्हटले की, “वरिष्ठ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात माझा कार्यकाळातील अनुभव शानदार राहिला. मागील काही वर्षात मी काही दिग्गज आणि देशातील प्रतिभावान खेळाडूंसोबत मिळून काम केले आहे. एनसीएमध्ये आपल्या नवीन भूमिकेसोबत मी भविष्यासाठी प्रतिभावान खेळाडूंना तयार करण्यात मदत करण्यासाठी माझा मागील वर्षांचा अनुभव पुढे न्यायला आवडेल. मी खेळ आणि बेंच स्ट्रेंथच्या विकासासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.”
येत्या 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका
कानिटकर हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 डिसेंबरपासून मुंबईत सुरू होत असलेल्या 5 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत भारतीय महिला संघासोबत जोडले जातील. (hrishikesh kanitkar appointed as batting coach of indian women cricket team read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही तर चीटिंग’, पाकिस्तान- इंग्लंड सामन्यातील टीव्ही पंचांच्या ‘त्या’ निर्णयाने वादाला फुटले तोंड
महत्त्वाच्या संघाची घोषणा! अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, तर सूर्याही ताफ्यात सामील