येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022) स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचे मेगा लिलाव (Mega auction) पार पडले होते. ज्यामध्ये अनेक खेळाडू कोट्यवधी झाले. तर काही खेळाडूंना खरेदी करण्यात फ्रँचायजींनी रस दाखवला नाही. दरम्यान लिलाव सुरू असताना, पहिल्याच दिवशी (१२ फेब्रुवारी ) ऑक्शनर ह्यूज एडमिड्स (Hugh edemeades) चक्कर येऊन पडले होते. त्यामुळे त्यांना बाहेर जावे लागले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचे पुनरागमन झाल्यानंतर सर्वांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ह्यूज एडमीड्स यांनी दुसऱ्या दिवसाचे (१३ फेब्रुवारी) लिलाव सुरू असताना एक व्हिडिओ शेअर केला होता. तसेच सर्वांची माफी देखील मागितली होती. त्यांनी म्हटले होते की, “मी तुम्हा सर्वांची माफी मागतो कारण मी तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित नाहीये. मी आता पूर्णपणे ठीक आहे, परंतु मला अजूनही वाटत आहे . मी लिलावात माझे १०० टक्के देऊ शकणार नाही. मला याचे खूप वाईट वाटत आहे. ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो.”
लिलावाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना झाली होती. ह्यूज एडमिड्स ऑक्शन सुरू असताना चक्कर येऊन पडले होते. ज्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. याच कारणास्तव ऑक्शन प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली होती. ह्यूज एडमीड्स बाहेर गेल्यानंतर त्यांच्या ऐवजी चारू शर्मा यांना ऑक्शन प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी जेव्हा ते ऑक्शन करण्यासाठी परतले, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
How heartening it is to see Mr. Hugh Edmeades – the IPL Auctioneer – back on the podium! 😊 👏
A round of applause for Mr. Charu Sharma, who took over the Auction proceedings in the absence of Mr. Hugh Edmeades. 👏 👏#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/d2AlKH2PYo
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
ह्यूज एडमीड्स हे ललित कला, क्लासिक आणि चॅरिटीसाठी लिलाव तज्ञ आहेत. ते गेल्या ३५ वर्षांपासून ऑक्शन करत आहे आणि आतापर्यंत त्यांनी जगभरात २५०० हून अधिक ऑक्शन केले आहेत. त्यांनी धर्मादाय ऑक्शनसाठी दुबई, हाँगकाँग, कॅसाब्लांका, न्यूयॉर्क, मुंबई, मॉन्टे कार्लो, लॉस एंजेलिस आणि टोकियो यासह ३० हून अधिक शहरांना भेट दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन
‘सचिनपुत्रा’ची यावर्षी वाढली किंमत! ‘इतक्या’ रकमेसह झाला मुंबई इंडियन्सचा भाग
मुंबईने घडविलेल्या ‘या’ गोलंदाजाला केकेआरने केले आपल्या ताफ्यात सामील