इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेचा १२ वा सामना मंगळवारी( ५ एप्रिल) राजस्थान राॅयल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर (RCB vs RR) या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानला ४ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने २३ चेंडूत ४४ धावांची महत्त्वाची खेळी खेळली, त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
यानंतर कार्तिक म्हणाला की, तो स्वत:ला अशाच खेळी खेळण्यासाठी तयार करत आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने पुढे सांगितले की, तो ३६ वर्षांचा झाला असला, तरी तो स्वत:ला समजवत असतो की, त्याचे क्रिकेट मैदानातील काम अजूनही पूर्ण झाले नाही. कार्तिक (Dinesh Karthik) असेही म्हणाला, तो त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे आणि तो स्वत:ला सतत हे सांगत असतो की क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा काळ अजूनही आलेला नाही.
तो म्हणाला, “जेव्हा मी क्रिजवर आलो, तेव्हा संघाला १२ धावा प्रति षटक हव्या होत्या. मला पुढे जायचे होते आणि मी स्वत:ला अशा परिस्थीतीत खेळण्यासाठीच तयार करत आहे. दबावाच्या काळात स्वत:ला शांत ठेवायचे आहे आणि हे ठरवायचे आहे की, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध जबाबदारी स्विकारायची आहे.”
तो पुढे म्हणाला की, “जेवढी शक्य होईल तेवढे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढे शक्य असेल, तेवढ्या परिस्थीतीत स्वत:ला तयार करत आहे.” त्याने २३ चेंडूत ७ चौकारांच्या आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या, त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
त्याच्या सामन्यातील खेळीबाबात बोलताना तो म्हणाला, “मी यावर्षी स्वत:ला न्याय देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कारण मी मानतो की मागील वर्षी चांगली कामगिरी करु शकलो असतो. ज्या पद्धतीने मी यावेळी तयारी करत आहे, ती खूप शानदार आहे. याचे श्रेय त्या व्यक्तीला जाते, जो माझ्यासोबत प्रशिक्षण घेत आहे.”
🗣️🗣️ "I am not done yet; I have a goal and I want to achieve something"@DineshKarthik on his transformation and goals ahead 👍 #TATAIPL #RRvRCB pic.twitter.com/ctOu0q4j79
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2022
या सामन्यात बॅंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने २० षटकात ३ गडी गमावत १६९ धावा केल्या. जाॅस बटलरने सर्वाधिक ७० धावा केल्या. हे लक्ष्य आरसीबीने ५ चेंडू राखुनच गाठले. दिनेश कार्तिकच्या शानदार खेळीच्या जोरावर संघाने हा सामना ४ विकेट्सने जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
मराठीत माहिती- क्रिकेटर दिलीप वेंगसरकर
RR vs RCB | बेंगलोरचा विजयरथ सुसाट, राजस्थानला ४ विकेट्सने हरवत नोंदवला सलग दुसरा विजय