कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्यातरी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) १३ वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा आयपीएलमध्ये १० संघ खेळवण्याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.
नुकतेच आयपीएलचे माजी सीओओ सुंदर रमण यांनी म्हटले आहे की पुढील २-३ वर्षात आयपीएलचा १० संघांपर्यंत विस्तार होऊ शकतो.
टेलिग्राफ स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सुंदर यांनी सांगितले की ‘मला खात्री आहे की आयपीएलचा दोन ते तीन वर्षांत ८ वरून १० संघांपर्यंत विस्तार होईल. आता आयपीएलच्या विस्ताराची आवश्यकता आहे. २००८ मध्ये सुरू झालेली आयपीएल आता परिपक्व झाली आहे.’
‘आपल्याकडे उपलब्ध पायाभूत सुविधा, कौशल्य पुरेसे आहे. तसेच हे खेळाडू किती कमाई करू शकतात आणि त्यातून पैसे कमवू शकतात यावर थोडा गंभीर विचार करणे आवश्यक आहे. मला वाटते की आयपीएलचा विस्तार करणे ही गरज आहे. जर आयपीएलचा विस्तार झाला तर त्यामुळे खेळाचा विकास होईल, मग का नाही?’
योबरोबरच रमण यांनी आयपीएलच्या विस्तारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, याबद्दलही भाष्य केले. सध्यातरी आयपीएलच्या दरम्यान सर्वाधिक समस्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना येते. कारण आयपीएल सुरु असताना त्यांच्या आंतरराष्ट्रीय मालिका सुरु असतात. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंना संपूर्ण मोसम खेळता येत नाही.
याबद्दल रमण म्हणाले, ‘आयपीएलचा विस्तार झाल्याने संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि यामुळे बोर्ड त्यांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाहीत. हे फार कठीण होईल यात काही शंका नाही. होय, ही समस्या असू शकते.’
‘परंतु पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश किंवा झिम्बाब्वे यासारख्या बोर्डांचा आर्थिक फायदा होऊ शकतो, हे आपण कसे सुनिश्चित करू शकतो? मला उत्तर माहित नाही. पण मला वाटते की आपण या मुद्द्यांवर बोललो तर आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उत्तर सापडेल.’
आयपीएलमध्ये २०११ चा मोसम १० संघांना घेऊन खेळवण्यात आला होता. तर २०१२ आणि २०१३ च्या मोसमात ९ संघांचा समावेश होता. पण २०१४ पासून आत्तापर्यंत ८ संघच आयपीएलमध्ये प्रत्येकवर्षी खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
पाकिस्तानचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू आढळला कोरोना पॉझिटिव्ह; घरामध्येच झाला क्वारंटाईन…
असा पार पडला लाॅकडाऊनमधील भारतात झालेला पहिला क्रिकेट सामना…
थोडी वाट पहा, टीम इंडियात होऊ शकते सेहवागचे पदार्पण