Loading...

मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हवेत चेंडू मारत नाही- विराट कोहली

शुक्रवारी (6 डिसेंबर) हैदराबाद येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

Loading...

भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) 50 चेंडूत नाबाद 94 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. विराटने त्याच्या या आक्रमक खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली.

सामन्यानंतर विराटने सांगितले की तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हवेत चेंडू मारत नाही. तर, धावा करणे हे आपले काम आहे आणि ते करुन देशासाठी सामना जिंकण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

या सामन्यानंतर टी20 क्रिकेेटमध्येही घाईत क्रिकेट खेळायचे नसते, असे कोहलीने म्हटले आहे. “जेव्हा मी टी20 क्रिकेट खेळतो तेव्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मी हवेत चेंडू खेळत नाही. मी माझे काम करण्यावर लक्ष केंद्रित करतो,” असे कोहली म्हणाला.

Loading...

“एक संघ म्हणून डावात वेगवान खेळणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझा खेळ बदलू इच्छित नाही कारण मी तिन्ही प्रकारात खेळत आहे. मी तिन्ही स्वरूपात योगदान देऊ इच्छितो. मला खेळाच्या एका प्रकारातील तज्ञ बनायचे नाही,” असेही कोहली म्हणाला.

Loading...
Loading...

Loading...
You might also like
Loading...